Thursday, April 25, 2024
Homeपुणेलोणावळाशिवजयंती निमित्त खंडाळा शिव जयंती उत्सव मंडळाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन....

शिवजयंती निमित्त खंडाळा शिव जयंती उत्सव मंडळाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन….

खंडाळा : शिवजयंती उत्सव साजरा करत असताना शिवजयंती उत्सव मित्र मंडळ खंडाळा यांच्या वतीने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शिव जयंती उत्सवाच्या माध्यमातून शिव जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून सामाजिक संस्कार देण्याचे उल्लेखनीय कार्य मंडळ विश्वस्त संस्था गेली ऐंशी ते शंभर वर्ष करत आहे.

स्वराज्याची निर्मिती करत असतानाचे जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन शिवजयंती उत्सव साजरा करत असताना उत्सव कार्यकारिणीच्या माध्यमातून खंडाळा भागात गेली अनेक वर्षापासून सामाजिक संस्कार रुजवण्याचे काम विश्वस्त मंडळ करत असल्याचे गौरवोद्गार लोणावळा विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी काढले.

याप्रसंगी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल,पोलीस उपनिरीक्षक मुजावर,शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे,प्रवीण गोसावी, विश्वस्त मंडळाचे दीपक मसुरकर, माजी नगरसेवक भालचंद्र खराडे, संजय कदम, राजेश सपकाळ, मारुती खोले, विशाल पाठारे, शाम बाबू वाल्मिकी, प्रमोद लोहिरे, प्रसाद शिर्के,सचिन वाळके, निलेश सुतार,वसंत दादा कदम, सतीश घाडगे,प्रकाश पवार, विलास पवार, शाम खराडे,श्रीमती तारामती शिर्के, हरिभाऊ देवडा,राजेश महाडिक,डॉक्टर प्रियंका खराडे,पंकज काळे, विलास पवार,उमेश देवकर, संतोष वाळके,भावेश खराडे,मोरेश्वर देवकर,मयूर पवार,चिराग खराडे,चैतन्य खराडे, निशांत शिरसागर,ओमकार खराडे, कुणाल देवकर, सिद्धू देवकर, राज संतोष परब, रोहित पांढरे, कार्तिक घाडगे, पवार, गणेश पांढरे, धनेश सपकाळ मार्तंड पांढरे, विशाल,स्वप्निल सपकाळ, सतीश गोणते, विजय चौरे, संतोष कचरे,रमेश कचरे,मंगेश कचरे,जोधाराम भाऊ देवडा,राजू इरले,भरत धुळे,दत्ता दळवी,ओमकार दळवी, दिनेश देवडा, रोहित गुरव, प्रतीक खराडे,ओम जांभूळकर, तेजस खराडे, जय दास ठाकूर,आदित्य दळवी, जयदीप ठाकूर, उमेश वाघ, आकाश पवार,उमेश गायकवाड, अनिश मांडवकर, ऋषिकेश लांगे, पार्थ माडीक, अशोक पाताडे,आकाश सोनवले, आदित्य पाताडे, नीरज परदेशी,यश सोनवले, अक्षय पवार, पंकज पवार इत्यादींसह शिवजयंती उत्सव मित्र मंडळाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी महिला भगिनी यांच्या उदंड प्रतिसाद व सहभागामूळे मिरवणुकीस भव्य व देखणेस्वरूप आले होते.

उत्सव मंडळाकडून शिवजयंतीनिमित्त किल्ले धनगड ते खंडाळा अशी शिवज्योत, खंडाळा माध्यमिक व प्राथमिक शाळेमध्ये किल्ले स्पर्धा,वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा त्याच बरोबर महिलांसाठी हळदी कुंकू, छोट्या मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा यासारखे विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page