Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवश्री आकाश कांबळे यांची संभाजी ब्रिगेडच्या कोकण उपाध्यक्ष पदी निवड !

शिवश्री आकाश कांबळे यांची संभाजी ब्रिगेडच्या कोकण उपाध्यक्ष पदी निवड !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या डॅशिंग संघटना ” संभाजी ब्रिगेड ” या संघटनेत अनेक पदे भूषवून त्या पदाला साजेसे महत्वपूर्ण कार्य केल्यावर वरिष्ठांचा विश्वास संपादन करून कर्जत तालुक्यातील डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते , असे आकाश कांबळे यांची संभाजी ब्रिगेडच्या कोकण उपाध्यक्ष पदी निवड नुकतीच पनवेल येथे करण्यात आली.
त्यांच्या या निवडीमुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.पनवेल रायगड येथे संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहासजी राणे व कोकण अध्यक्ष सूर्यकांत भोसले, साहेब यांच्या मार्गदर्शनाने , कोकण संघटक अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत संभाजी बिग्रेडचे रायगड कार्याध्यक्ष आकाश कांबळे , यांची संभाजी बिग्रेड कोकण उपाध्यक्ष पदी निवड झाली. धार्मिक व सामाजिक तेढ तसेच जातीयवाद समाजातून समूळ नष्ट करा , असे महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोजदादा आखरे व रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सुहासजी राणे यांच्या सूचनेनुसार आगामी होऊ घातलेल्या संभाजी ब्रिगेड व शिवसेना या राजकीय युती बद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्ष बांधणी जोमाने सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कर्जत शहरात रहाणारे आकाश कांबळे हे डॅशिंग नेतृत्व असून फुले – शाहू – आंबेडकरी विचारांवर चालणारे अनुयायी असून कर्जत तालुक्यातील बहुजन वर्गावर होणारे अन्याय – अत्याचार विरोधात सातत्याने आवाज उठविणारे आहेत . त्यामुळे त्यांची संभाजी ब्रिगेड कोकण उपाध्यक्ष पदी निवड ही योग्य असून त्या पदाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन , असे मत आकाश कांबळे यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page