Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कर्जतमध्ये विविध उपक्रमाने साजरी !

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कर्जतमध्ये विविध उपक्रमाने साजरी !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचारांना त्यांच्या जयंतीनिमित्त नतमस्तक होऊन कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी अनेक सामाजिक – शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांची जयंती साजरी केली.
महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थान म्हणजे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तर ” शिवसेना ” हे प्रेरणास्तोत्र महामंत्र असल्याने बाळासाहेबांच्या विचारांनी घडलेले आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज २३ जानेवारी २०२३ या दिनी श्रीमान – आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कर्जत शहर ” बाळासाहेबांची शिवसेना ” पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात प्रामुख्याने सुरभी ज्वेलर्स कर्जत येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . तर वर्णे वृद्धाश्रम येथे उपयोगी वस्तूंचे वाटप केले यांत किराणा माल , बेडशीट व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले.

तसेच जीवन शिक्षण मंदिर, दहिवली येथे विध्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले. जनता विद्या मंदिर, दहिवली येथे १ ली ते ७ वी च्या अभ्यासक्रमसहित टॅब देण्यात आला.यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थिती बरोबरच उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , त्याचप्रमाणे शहरातील सर्व पदाधिकारी , नवनिर्वाचित प्रभागातील प्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page