Friday, March 29, 2024
Homeपुणेशिवापूर इथून दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे स्थानिक गुन्हे शाखेने...

शिवापूर इथून दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे स्थानिक गुन्हे शाखेने केल्या हस्तगत…

राजगड दि.08: रोजी खेड शिवापूर येथून 2 गावठी पिस्टल व 4 जिवंत काडतूसे हस्तगत करून 2 जणांस ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश.

आरोपी – संतोष अंकुश डिंबळे ( वय 21, रा. दत्तनगर, टेल्को कॉलनी, पुणे, ता. हवेली, जि. पुणे ) व उमेश दिलीप वाव्हळ( वय 25, रा. बांडेवाडी, खेड शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे ) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीवरून दि.8 रोजी स्थानिक गुन्हे शाखेची टिम राजगड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल प्राण येवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार पुणे ते सतारा रोडवर कोंढणपूर चौकात हायवेच्या ब्रिजखाली उभे असलेल्या दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली वरून व मिळालेल्या बातमीच्या वर्णनावरून दोन इसम संतोष व उमेश यांना सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतल्यास त्यांच्याकडे विनापरवाना व बेकायदेशीर बाळगलेले प्रत्येकी 2 गावठी पिस्टल व मॅगझीन मध्ये 4 जिवंत काडतुसे असा एकुण 1,00,400/- (एक लाख चारशे ) रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

सदर गावठी पिस्टल कुठून व कोणत्या हेतूने आणले याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी हे दोन्ही पिस्टल हे प्रवीण मोरे (रा.शिवरे, ता.भोर, जि.पुणे) याने आमच्याकडे ठेवायला दिले होते अशी हकीकत सांगीतली आहे.

वरील दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी राजगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे ,पोलीस नाईक,अमोल शेडगे, पोलीस कॉन्स्टेबल प्राण येवलेयांच्या पथकाने ही दमदार कारवाई केली आहे.

(स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्हेगाराला जो चाप बसत आहे याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.)

- Advertisment -

You cannot copy content of this page