Friday, April 19, 2024
Homeपुणेलोणावळाशुक्रवार बाजार चालू करा असा सूर लोणावळ्यातील नागरिकांमध्ये उमटला आहे..

शुक्रवार बाजार चालू करा असा सूर लोणावळ्यातील नागरिकांमध्ये उमटला आहे..

लोणावळा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गोवोगावी प्रमाणे लोणावळा शहरातील आठवडे बाजार बंद केला आहे. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळू लागला परिणाम भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली त्यामुळे मावळातील शेतकरी व लोणावळ्यातील सामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. शासनाने लवकरात लवकर लोणावळा येथील शुक्रवारचा आठवडे बाजार सुरु करावा अशी मागणी लोणाव्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मागील वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉक डाऊन घोषित केले होते. त्यावेळी सर्व व्यवहार बंद ठेऊन काही अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर शासनाने टप्प्या टप्प्याने सर्व व्यवहार सुरु केले मात्र आठवडे बाजारांवरील बंदी कायम राहिली. तरीही मावळवासियांना आठवडे बाजार सुरु होतील अशी आशा होती. मात्र त्यातूनही कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शासनाला पुन्हा लॉक डाऊन घोषित करावा लागला आणि त्यामुळे आठवडे बाजार सुरु होण्याच्या आशा मावळल्या.

त्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शासनाने मागील महिन्यापासून टप्प्या टप्प्याने सर्व व्यवहार सुरळीतपणे प्रयत्न सुरु केले आहेत त्यानुसार हॉटेल, मॉल, शाळा, कॉलेज व सर्व देवस्थाने सुरु करण्याचे आदेश काढले आहेत. त्याचबरोबर मावळातील काही मुख्य शहरांमधील आठवडे बाजार सुरु झाले असून. लोणावळा शहरातील आठवडे बाजाराला शासनाची बंदी का? अशी चर्चा लोणावळा शहरात व परिसरात सुरु आहे.


आज लोणावळा प्रशासनाने टेबल लॅण्ड येथे भाजी विक्रेत्यांना परवानगी दिली आहे परंतु त्याठिकाणी भाजी खरेदीसाठी येणाऱ्यांना कुठलेच भान दिसत नाही अथवा शुक्रवार आठवडे बाजारा प्रमाणे ग्राहकांची गर्दी होत आहे. कुठल्याही ग्राहकांच्या तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टंसिंगचा तर फज्जाच उडताना याठिकाणी दिसत आहे. मग अशा परिस्थितीत लोणावळा नगरपरिषदेने ही सर्व बाब लक्षात घेऊन येथील आठवडे बाजाराच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोणावळा शहरातील आठवडे बाजार पुन्हा सुरु करण्याबाबत लोणावळा नगरपरिषद कुठलेही पाऊल उचलताना दिसत नसल्याने मावळचे आमदार सुनील शेळके यांनी याबाबतीत लक्ष घालावे व लोणावळ्यातील शुक्रवारचा आठवडे बाजार सुरु करून परिसरातील सामान्य नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी याठिकाणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page