Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळासदापूर हद्दीतील नदीपात्रात आढळला मृतदेह !

सदापूर हद्दीतील नदीपात्रात आढळला मृतदेह !

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रात 30 ते 40 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला असून त्याबाबत गु र क्र.28/2022, भा द वी कलम 174 नुसार अकस्मात मयत नोंदविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.22 रोजी 3:50 वाजन्याच्या सुमारास सदापूर गावच्या हद्दीतील स्मशानभूमी च्या बाजूला इंद्रायणी नदीपात्रात एका 30 ते 40 वर्षीय अनोळखी इसमाचा पाण्यात बुडालेला मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून मृतदेह डी. कंपोज झाल्याने मृताची ओळख पटविण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे राहिले आहे. तरीही या मयताबद्दल कोणाला काहीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मयताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. वय अंदाजे 30 ते 40 वर्ष पुरुष, सदर मयताच्या उजव्या हाताच्या दंडावरती सूर्य व त्यामध्ये ओम असे गोंदले आहे, तसेच मयताच्या उजव्या हातात लाल रंगाचा धागा बांधलेला आहे मयत डी कंपोज झाल्याने चेहरा ओळखून येत नाही तरी सदर गोंदलेल्या खुणेवरून सदर मयताची ओळख पटल्यास, नातेवाईकांचा तपास लागल्यास मयताबाबत माहिती मिळून आल्यास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन दूरध्वनी क्र.02114 /273036 वर संपर्क साधावा किंवा तपासी अंमलदार एस एम शेख लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मोबाईल नंबर 8830633017 यांच्याशी संपर्क साधावा.

- Advertisment -

You cannot copy content of this page