Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळासमतानगर क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेत अनेक स्पर्धाकांचा सहभाग !

समतानगर क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेत अनेक स्पर्धाकांचा सहभाग !

लोणावळा : समतानगर क्रिकेट क्लब ( वलवण ) आयोजीत भव्य फ्री हॅन्ड क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि.9/3/2022 ते 13/3/2022 या कालावधीत करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी नवचैतन्य तरुण मंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे.त्याच बरोबर लोणावळा नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर यांच्या वतीने प्रथम क्रमांकासाठी 11000 रु. रोख पारितोषिक तर मा. उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे यांच्या वतीने द्वितीय क्रमांकासाठी 7000 रु.रोख बक्षीस तर तृतीय क्रमांकसाठी अमोल गायकवाड यांच्या वतीने 5000 रु. रोख तसेच चतुर्थ क्रमांकासाठी 3000 रु. रोख पारितोषिक राजू देसाई यांच्या वतीने असून सुरज टपाले यांच्या वतीने पाचव्या क्रमांकासाठी 2000 रोख पारितोषिक अशी आकर्षक बक्षिसे असून प्रत्येक विजेत्या संघाला रोख पारितोषिका बरोबर एक चषकही देण्यात येणार आहे.उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामना विर व मालिका विर अशी वैयक्तिक बक्षिसे देखील आयोजक कमिटीकडून ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेचे आयोजन वलवण नांगरगाव रोड , इंद्रायणी नदी जवळील मैदानावर करण्यात आले आहे. तरीही जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले कौशल्य दाखवावे असे आवाहन आयोजक कमिटीकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page