Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसहाव्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद व संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी डॉ. जयपाल...

सहाव्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद व संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी डॉ. जयपाल पाटील…

अलिबाग : जागतिक आपत्ती परिषदेचे आयोजन करणाऱ्या डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन कन्हर्सेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आनंद बाबू यांनी ज्येष्ठ पत्रकार , आपत्ती व्यवस्थापन तज्ञ , रायगड भूषण जयपाल पाटील यांची सहाव्या जागतिक आपत्ती परिषदेच्या समन्वयक पदी व महाराष्ट्र अध्यक्षपदी नेमणूकीचे पत्र हैदराबाद येथील संस्थेच्या कार्यालयात दि.11 रोजी देण्यात आले .
पुढील वर्षी उत्तरांचल डेहराडून येथे सहाव्या जागतिक आपत्ती परिषदेचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्याची जबाबदारी जयपाल पाटील यांच्याकडे सोपविली आहे . यावेळी डॉक्टर आनंद बाबू म्हणाले की आमच्या डी.एम. आय.सी.एस.संस्थेची स्थापना सन 2005 साली झाली असुन आपत्ती व्यवस्थापनाच्या जागतिक पातळीवर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सहयोगाने पहिली जागतिक आपत्ती परिषद 2008 साली देशाचे त्यावेळचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत हैदराबाद येथे संपन्न झाली . दुसरी विशाखापट्टणम 2015 साली , तिसरी विशाखापटनम 2017 साली , चौथी मुंबई 2019 साली , पाचवी दिल्ली येथे 2021 साली व उत्तराखंड , डेहराडुण येथे 2023 साली होणार आहे .
जयपाल पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या जागतिक आपत्ती परिषदेत टू व्हीलर मोटरसायकल अपघात व दिल्ली येथे झालेल्या परिषदेमध्ये ” कोविड 19 नंतर काय ? ” हे शोधनिबंध सादर केले होते . संपूर्ण महाराष्ट्रात जनतेला आपत्ती व सुरक्षा विषयक ज्ञानदान व्याख्याना द्वारे व आकाशवाणी माध्यमातून करतात .याकडे आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष होते , त्यांचे आपत्ती व सुरक्षा विषयक अफाट ज्ञान पाहून आमच्या संस्थेने त्यांना जागतिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष पदाची सूत्रे त्यांना दिली आहेत.
आमच्या संस्थेत आपत्ती सुरक्षा बाबत जगातील नामवंत तज्ञ असून त्यामध्ये जयपाल पाटलांची भर पडली आहे , याचा आम्हाला आनंद होत असल्याचे ते म्हणाले तसेच आमची संस्था आपत्ती मुक्त समाज यासाठी कार्यरत असून जगप्रसिद्ध आहे , असेही डॉक्टर आनंद बाबू म्हणाले त्याच बरोबर पुढील वर्षी डिसेंबर 2023 मध्ये उत्तरांचल डेहराडून येथे होणाऱ्या सहाव्या जागतिक आपत्ती परिषदेसाठी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून आपत्ती व सुरक्षा विषयाच्या अभ्यासकांनी , संस्थांनी जयपाल पाटलांशी संपर्क साधावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
आम्ही दरवर्षी आपत्ती व्यवस्थापनात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना सन्मानित करीत असतो. पुढील वर्षी मे महिन्यात गोवा पणजी येथे या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे . असे डॉक्टर आनंद बाबू यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page