Friday, March 29, 2024
Homeपुणेमुळशीसोनू अनाजी वाळंज विद्यालय आंबवणे येथे माता कन्या पूजनाचे आयोजन...

सोनू अनाजी वाळंज विद्यालय आंबवणे येथे माता कन्या पूजनाचे आयोजन…

अंबवणे वार्ताहर :- जागतिक महिला दिना निमित्त सोनू अनाजी वाळंज विद्यालयात माता – कन्या पूजन व इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी मा.आदर्श सरपंच सौ. वत्सलाताई वाळंज,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेशदादा कालेकर, डॉ.सौ.रोहिणी गडसिंग,सिंधुताई कालेकर, शाळा व्य. समिती अध्यक्ष नारायण दळवी , मैथिलीताई जाधव, मुख्याध्यापक बी. जी.देवरे, युवा कार्यकर्ते प्रकाश हुंडारे इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पाच महान महिलांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


या वेळी वत्सलाताई यांच्या कन्या डॉ. रोहिणी गडसिंग यांच्या पासून माता – कन्या पूजनास सुरवात झाली. एकूण 11 मातांचे पूजन यावेळी करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. रोहिणी गडसिंग म्हणाल्या की, असा नवीन उपक्रम राबविण्यात आल्याने मनापासून आनंद झाला.कोविड काळात शिक्षकांनी अतिशय मेहनतीने अभ्यासक्रम पूर्ण केला दोन सराव परीक्षा झाल्या आहेत.शाळा तिथेच केंद्र यामुळे आपल्याच विद्यालयात उपकेंद्र असल्यामुळे जबाबदारी नकीच आहे. त्यासाठी काही मदत लागली तरी आपण करूयात.आणि सर्व परीक्षार्थीना शुभेच्छा दिल्या.
सौ. वत्सलाताई म्हणाल्या की, जाईआई यांच्या स्मरणार्थ आपण गरजू मुलींसाठी पूर्ण शिक्षणाचा खर्च करू. बाळासाहेब खेडकर, शालिनी देवरे,व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. सौ. कोमलताई वाशिवले मा. सभापती व अमित आखाडे युवा मंच तसेच मिथुन कदम यांच्या वतीने विद्यालयास महान नेत्यांचे फोटो भेट देण्यात आले व प्रकाश हुंडारे यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.


या प्रसंगी ज्योत्स्ना कुलथे, मंदा वाळंज, शैला लोहेकर, मंगलताई शिंदे,सारिका वाळंज,सोनाली जंगम,सीमा खेडकर, नागेश दाभाडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्याध्यापक बी.जी. देवरे सर म्हणाले की, अतिशय खडतर काळात या विद्यार्थ्यांचे अध्यापन कार्य उत्तम रित्या पार पडले आहे. प्रतिकूल परिस्तिथीत मा. जयेश शेठ मुंबई व संस्थापक अध्यक्ष नंदकुमार वाळंज यांनी विद्यालयाचे पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झालेले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा! तसेच या निमित्ताने सर्व मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत केले व दानशूर देणगीदारांचे आभार मानले. व बाबूजीं मा. नंदकुमार वाळंज यांना प्रशांत पुराणिक यांच्या साप्ताहिक अंबर कडून जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याचे सांगून वाळंज परिवाराचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन कुलथे एस. एस. यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल आवळे, विजय दळवी, महादेव खेडकर, संतोष दळवी व सर्व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.

- Advertisment -

You cannot copy content of this page