Thursday, April 18, 2024
Homeपुणेलोणावळासोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई...

सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई…

लोणावळा : ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर अनुचित प्रकार घडला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर काही अनुचित प्रकार घडला असल्याची व्हिडीओ क्लिप काही व्यक्तींनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. सदरचा हा व्हिडीओ खोडसाळपणाचा प्रकार असून, हे असत्य असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाच्या गंभीर स्थितीतून जात असताना आरोग्याच्या दृष्टीने सर्वसामान्य जनता चिंतेत असताना, असा प्रकार करणाऱ्या व्यक्ती समाजाचे भले करण्या ऐवजी चिंता वाढविण्याचा प्रकार करत आहेत. या सर्व प्रकाराची शहानिशा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक, पुरातत्व विभाग, सुरक्षा स्टाप, लोहगड ग्रामस्थ, सरपंच व पोलीस पाटील तसेच दर्गा ट्रस्टचे सदस्य यांनी लोहगड किल्ल्याला भेट देऊन संपूर्ण किल्ला तपासला असता असा काही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

सोशल मीडियावर खोट्या व्हिडीओ द्वारे समाजात अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहेच तरी सर्व नागरिकांनी दक्ष राहून अशा चुकीच्या व खोडसाळ बाबींकडे दुर्लक्ष करावे तसेच काही संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क करावा.व कोरोनाच्या नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page