Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडस्थानिकांच्या मागणी नुसार कर्जत माथेरान मिनीबस च्या वेळापत्रकात बदल..

स्थानिकांच्या मागणी नुसार कर्जत माथेरान मिनीबस च्या वेळापत्रकात बदल..

माथेरान । दत्ता शिंदे । प्रतिनिधी
कर्जत- माथेरान मिनीबसच्या वेळापत्रकात सोयीस्कर बदल करणेबाबत स्थानिक रहिवाशी व मिनी बसच्या प्रवाशी वर्गाच्या सोयीनुसार व मागणीनुसार कर्जत- माथेरान मिनी बसच्या वेळापत्रकामध्ये थोडा सोयीस्करबदल करणे गरजेचे होते याकामी माथेरान मधील काही राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी कर्जत एसटी आगार व्यवस्थापक शंकर यादव यांना समक्ष भेटून लेखी निवेदने सादर केली होती.


सध्या कॉलेज बंद असल्याने पहाटे कर्जत हुन ५-१५ वाजता व माथेरानहुन ६-१५ ची मिनी बसची फेरी पूर्ण रिकामी असते.
प्रवाश्यांच्या मागणीनुसार व सोईनुसार मिनीबसच्या प्रस्तावित
वेळापत्रकाची मागणी २७ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते नितीन विश्वनाथ सावंत यांनी निवेदन दिले होते तर नगराध्यक्षा
प्रेरणा प्रसाद सावंत यांनी सुध्दा अनेकदा याबाबतीत कर्जत आगार प्रमुखांना निवेदन सादर केले होते.

माथेरान मधील नागरिकांच्या या मागणीचा सारासार विचार करून शंकर यादव यांनी मिनीबसच्या वेळापत्रकात बदल केला आहे.


कर्जत ते माथेरान
सकाळी -०६-००
सकाळी—०८-३०
दुपारी—-१२-०५
दुपारी—-१४-३०
सायंकाळी ०५-०० तसेच
माथेरान ते कर्जत
सकाळी -०७-१५,
सकाळी—-०९-४५,दुपारी-१३-२०,
दुपारी —१५-४५
सायंकाळी—१८-१०
स्थानिकांच्या मागणीनुसार कर्जत -माथेरान मिनी बसचा स्टॉप नेरळ खांडा येथेच असावा जेणेकरून प्रवाशांना अगदी सोयीस्कर होऊ शकते यासाठी प्रवाशांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ही बस काही दिवसांपूर्वी खांडा येथे स्टॉप घेत आहे त्यामुळे प्रवाशांना सोयीचे ठरत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page