Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करा ,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करा ,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश !

मुंबई : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . त्यामुळे लवकरच महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे . ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत .

ओबीसी आरक्षणावरील अंतिम सुनावणीत हे आदेश देण्यात आले आहेत . सर्वोच्च न्यायालयात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती . त्या याचिकेवर हे आदेश देण्यात आले आहेत . स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर निवडणुकांचे अधिकार राज्याने विशेष कायदा पारित करत स्वतःकडे घेतले.

त्यानंतर राज्यातल्या विविध महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत . या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते . राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात 13 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या .या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील 7 , 21 , 25 एप्रिलची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली . त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्याच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याच निर्देश दिले आहेत . ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page