Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडहालीवली येथे " संविधान गौरव दिन " मोठ्या उत्साहात साजरा !

हालीवली येथे ” संविधान गौरव दिन ” मोठ्या उत्साहात साजरा !

मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अंकुश सुरवसे यांचा पुढाकार..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात नेहमीच अग्रेसर राहून बहुजन वर्गात जागृती – प्रोत्साहन – व महापुरुषांची महंती व त्यांचा इतिहास मन – मस्तिष्क मध्ये पेरून या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात भावी प्रशिक्षित पिढी घडविण्याचे कार्य सातत्याने ” मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या ” वतीने संस्थेचे अध्यक्ष अंकुश सुरवसे करत आहेत . म्हणूनच आपला भारत देश ज्या संविधानावर खंबीरपणे सुरक्षित उभा आहे , त्या संविधानाचे महत्व सर्वांना ज्ञात व्हावे , या करिता २६ नोव्हेंबर २०२२ हा ” संविधान गौरव दिन ” म्हणून कर्जत शहरालगत असलेल्या हालीवली ग्रामपंचायत हद्दीत सिग्नेचर डिसायर संकुल (हालिवली) येथे मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने ” संविधान दिन ” कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश रामराव सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता , यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हालिवली ग्रामपंचायतीच्या विद्यमान कार्यसम्राट सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे , हालिवली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. म्हात्रे सर, सुरेश बोराडे (तंटामुक्ती अध्यक्ष), माजी सरपंच रमेश दिनकर , सामजिक कार्यकर्ते अरुण हांडे , मनोहर शिंदे , सामाजिक कार्यकर्ते सुजित गायकवाड (किरवली) ,सामाजिक कार्यकर्ते राजेश गायकवाड (कडाव), बालदिगंबर मोटर्स प्रो.प्रा. देविदास जाधव (कडाव), महेश दाभणे ,आनंद सोनवणे, राकेश देशमुख,विठोबा देशमुख,अशोक कश्यप,ज्योती गायकवाड (कडाव) , मनिषा चव्हाण , आदी मान्यवर उपस्थित होते . संविधान दिनाचे औचित्य साधून जाहीर व्याख्यान व्याख्याते म्हणून कडाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अण्णा आघम यांनी भारतीयत्व हाच धर्म , संविधान हाच धर्मग्रंथ ! या विषयावर व्याख्यान दिले . यावेळी सामूहिक संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले व सर्व वचनबद्ध झाले.
सूत्रसंचालन अतुल सोनावणे व संतोष सुरवसे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश लादे , कार्याध्यक्ष संतोष सुरवसे , सचिव शशिकांत उबाळे , खजिनदार गणेश गायकवाड , संपर्कप्रमुख मयूर गायकवाड , सहसचिव राजेश जाधव , संघटक मयुर बडेकर , संकल्प निकम , सहचिटणीस अमित गायकवाड , प्रसिद्धीप्रमुख विजय गायकवाड , प्रमुख सल्लागार विशाल तांबे , राजकुमार भंडारे , जुगल किशोर चौधरी , गोरख सुरवसे , गौरव वानखेडे , विजय कांबळे , गणेश सुरवसे , रोहन गायकवाड , दर्शन गायकवाड , श्रेयस वाघमारे , धीरज गायकवाड , निहाल उबाळे , शौर्य वानखेडे , जनार्दन पवार , महेश भोसले , भूपेश गायकवाड , मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्था महिला कार्यकारिणी सोनाली गायकवाड , वर्षा उबाळे , अक्षता गायकवाड , वर्षा लादे , जयश्री सुरवसे , संपदाबाई गायकवाड , मोनिका भोसले , ज्योत्स्ना कांबळे , शितल वानखेडे , श्वेता गायकवाड , सारिका भंडारे , माधुरी निकम यांनी मेहनत घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात बहुजन वर्ग उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page