Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडहालीवली सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे " थोर महिला प्रवचनकार "...

हालीवली सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे ” थोर महिला प्रवचनकार ” म्हणून सन्मानित !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )चांगल्या संस्कृतीतुन उच्च प्रतीचे संस्कार घडतात.चांगले विचार श्रवण केल्यास आचार व विचारांवर प्रघात होऊन शुद्ध मनाने शुद्ध कर्म घडून त्याची जडणघडण दैनंदिन जीवनात केलेल्या कार्यावर होऊन सूर्याच्या तेजासारखे तळपून ते कार्य किरणांसारखे सर्वदूर पसरतात.
म्हणूनच थोर संतांच्या सत्संग मार्गाचा अवलंब करून लहानपणापासून आज पर्यंत सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक व राजकीय पटलावरील केलेले त्यांचे कार्य नागरिकांना हिताचे ठरत आहेत.थोर संतांचे विचार आत्मसात करून शक्ती आणि भक्तीची सांगड घालून आपल्या हातून सत्कर्म करणाऱ्या थोर महिला प्रवचनकार तथा कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायतीच्या ” थेट आणि ग्रेट सरपंच ” सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांचा कर्जत तालुक्यातील ” महिला प्रवचनकार ” म्हणुन नुकताच सत्कार करण्यात आला.
श्री सोमजाई माता मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा नुकताच कर्जत तालुक्यातील सांगवी येथे पार पडला .या भव्य सोहळ्यात थोर प्रवचनकार सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांचा यावेळी श्री विठ्ठल रखुमाईची मुर्ती – शाल – साडी – श्रीफळ – देऊन शिवसेना मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग तथा आप्पासाहेब बारणे , रायगड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनिल तटकरे , कर्जत – खालापूर मतदार संघाचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड , रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण ,आरोग्य व क्रीडा सभापती सुधाकर भाऊ घारे यांच्या हस्ते त्यांच्या प्रवचनद्वारे करत असलेल्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कर्जत-खालापुर तालुक्यातील हरिकीर्तनकार व प्रवचनकार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अनेक कीर्तनकार – प्रवचनकार तसेच विविध सामाजिक – राजकीय – शैक्षणिक- धार्मिक क्षेत्रातील नामांकित मान्यवर व कर्जत खालापूर मतदार संघातील नागरिक , सांगवी परिसरातील महिला व ग्रामस्थ मंडळी या सोहळा कार्यक्रमास उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page