Friday, March 29, 2024
Homeपुणेलोणावळा"हिंदवी करंडक 2022 " या स्पर्धेचा मानकरी श्रीराम वारिअर्स लोणावळा संघ...

“हिंदवी करंडक 2022 ” या स्पर्धेचा मानकरी श्रीराम वारिअर्स लोणावळा संघ…

लोणावळा : लोणावळा शहरातील प्रथमच लोणावळा क्रिकेट क्लब आयोजित ” हिंदवी करंडक 2022″ या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन लोणावळा रेल्वे ग्राउंड येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेत शहरातील आठ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. सलग तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन शुक्रवार दि.27 रोजी करण्यात आले होते. यावेळी आठ प्रतिस्पर्धीना मात देऊन श्रीराम वोरिअर्स व टिकू 11 या दोन तडपदार संघांनी अंतिम सामन्यात आपले स्थान कायम केले होते. यावेळी अंतिम सामन्याचे नाणेफेक निखिल कवीश्वर यांच्या हस्ते करून टिकू 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.


या आठ शटकांच्या अंतिम सामन्यात श्रीराम वारिअर्स संघाने टिकू 11 या संघाचा 43 धावांनी पराभव करत विजेतेपद मिळविले .श्रीराम वारिअर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यानंतर मैदानावर जल्लोष केला . सदर स्पर्धेचे आयोजक हनुमंत शिंदे, हेमंत लोखंडे व दिनेश शिंदे यांच्या वतीने विजयी संघांचे अभिनंदन करण्यात आले. लोणावळा परिसरातील 8 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते . अंतिम सामन्यात श्रीराम वारिअर्स संघाने जोरदार फटकेबाजी करत 128 धवांचे मोठे आवाहन टिकू 11संघासमोर ठेवले होते . ही धावसंख्या गाठताना टिकू 11 संघाला 43 धावांनी हार पतकरावी लागली.

हिंदवी करंडक या स्पर्धेचा अंतिम सामन्याचा सामनावीर व मालिका विर हे स्पोर्ट सायकलचे पारितोषिक देवेंद्र वारुळे याने पटकाविले तर
स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज सुधीर शेलार,तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुरज गायखे तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक सुरज दोंडगे यांने पटकाविला आहे.त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ उंच षटकाराचे पारितोषिक अमित परदेशी याने पटकाविले आहे.हिंदवी करंडक 2022 या मालिकेचा मालिकावीर श्रीराम वारिअर्स तर उप विजेता हा मान टिकू 11 या संघाने मिळविला तसेच या मालिकेच्या तिसऱ्या क्रमांकावर लक्की बॉईज व चौथ्या क्रमांकावर रिदिमा 11 या संघाने बाजी मारली. अगदी खेळी मेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडली.

तसेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडताना हरीश जाणीरे व सुनील रेड्डी यांनी उत्तम पंच असे काम पाहिले तर डी जे रितेश (सोन्या ) यांच्या डी जे वरील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.तसेच या संपूर्ण मालिकेचे निवेदन सुमित सोनवणे यांनी केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page