Thursday, March 28, 2024
Homeपुणेलोणावळाहॉटेल व्यवसाय सुरु आता लोणावळेकर आठवडे बाजाराच्या प्रतीक्षेत.... नागरिकांची मागणी..

हॉटेल व्यवसाय सुरु आता लोणावळेकर आठवडे बाजाराच्या प्रतीक्षेत…. नागरिकांची मागणी..

लोणावळा : कोरोना विषाणूचे सावट अद्याप गेले नसून लोणावळा शहरातील भाजीचे दर संपूर्ण लॉकडाऊन पासून वाढतच चालल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.नुकतेच महाराष्ट्र शासनाने अनलॉक मध्ये सर्व व्यवसायांना सुरु करण्यासाठी काही नियम व अटी लागू करत परवानगी दिली आहे.
त्याच प्रमाणे लोणावळा नगरपरिषदेणे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शुक्रवारचा आठवडे बाजार सुरु करावा अशी कळकळ नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व व्यवसाय बंद ठेऊन भाजी व्यवसाय अत्यावश्यक असल्यामुळे नियम व अटीद्वारे सुरु ठेवले होते. त्याच लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून भाजीचे दर हे गगनाला भिडले आहेत.
आज अनलॉक असतानाही लोणावळा भाजी मार्केट मधील भाजीचे दर अद्याप कमी झाले नाहीत. एकतर नागरिकांमध्ये बेरोजगारी पसरली असताना कामशेत, वडगाव या ठिकाणच्या भाजी दरापेक्षा लोणावळा भाजी मार्केट येथील भाजीचे दर सरासरी पंधरा ते विस रुपये जास्तच आहेत. अशा परिस्थितीत काय खावे आणि काय नाही असा प्रश्न सामान्य जनतेत निर्माण झाला आहे.
शासनाने जसे हॉटेल व्यवसायाला नियम लागू करत परवानगी दिली आहे त्याच प्रमाणे लोणावळा प्रशासनाने शुक्रवारचा आठवडे बाजारही सुरु करावा अशी नागरिकांची मागणी आहे. शहरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन नगरपरिषदेणे शुक्रवारचा आठवडे बाजार हा प्रत्येक विभागात प्रमाणे विभाजून नियोजन करून सुरु करण्यासाठी तरतूद केली पाहिजे. शहरातील वलवण, नांगरगाव, तुंगार्ली, न्यू तुंगार्ली, रायवूड, गावठाण, भांगरवाडी, ओळकायवाडी , व लोणावळा मुख्य बाजारपेठ असे विभागून आठवडे बाजार सुरु करण्यात काही हरकत नाही, त्यामुळे विभाजून आठवडे बाजार ठेवल्याने बाजारात एका वेळी गर्दी होणार नाही.
सध्या भाजी मार्केटमध्ये सुरु असलेला भाजी व्यावसायिकांच्या मनमानी कारभाराला आळा बसेल, त्यामुळे आठवड्यातून एकदा स्वस्त भाजी मिळाल्याने सामान्य नागरिक सुखावेल. तरी नगरपरिषदेणे लोणावळा शुक्रवार आठवडे बाजाराचा विचार करून तो सुरु करण्याकरिता काहीतरी तरतूद करावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page