Thursday, September 28, 2023
Homeक्राईम20 वर्षीय युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणी,शहर पोलीसांकडून 21 वर्षीय आरोपीला अटक…

20 वर्षीय युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणी,शहर पोलीसांकडून 21 वर्षीय आरोपीला अटक…

लोणावळा (प्रतिनिधी): कुरवंडे गावाकडे निघालेल्या महिलेला लिफ्ट देतो असे सांगून निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात सदर महिलेचा विनयभंग केल्याची घटना काल दि.20 रोजी घडली असून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित युवतीने फिर्याद दिली असून आरोपी वैभव साठे (वय 21, रा. ओळकाईवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एक 20 वर्षीय युवती ऑक्झिलियम कॉन्व्हेंट शाळेपासून कुरवंडे गावात आपल्या घराकडे जात असताना आरोपी वैभव साठे हा मोटारसायकलवर आला आणि मी कुरवंडे गावाकडेच निघालो आहे असं सांगत तिकडे सोडतो असं या पीडित युवतीला म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवून गाडीवर बसलेल्या युवतीला आरोपी वैभव याने निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात तिच्या एकटेपणाचा फायदा घेवुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याशी लगट करण्याचा आणि हात पकडुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादवी कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणावळा शहर पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस नाईक हनुमंत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज मोरे, राजेंद्र मदने यांनी मोठ्या शिताफीने आरोपीला जेरबंद केले .या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक मुजावर हे करत आहेत.
- Advertisment -