काँग्रेस चे मावळ तालुका प्रवक्ते फिरोज शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश…

0
296

मुंबई : लोणावळा शहरातील काँग्रेसचे तालुका प्रवक्ते फिरोज शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

गुरुवार दि.7 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उप मुख्यमंत्री अजितदादा पवार, मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यालय मुंबई येथे पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी लोणावळा शहरातील गावठाण, भुशी व रामनगर येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

फिरोज बंगाली यांनी मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात कार्यकर्ता ते मावळ तालुका प्रवक्ते पदापर्यंत जबाबदारी स्वीकारून पक्षाला बळकटी दिली आहे.

सर्व चळवळीत अग्रेसर असणारे फिरोज शेख यांच्या स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक चांगला वक्ता मिळाला असून पक्षाला याचा नक्कीच फायदा होईल.लोणावळा नगरपरिषद च्या मागील निवडणुकीत लोणावळा गावठाण विभागातून काँग्रेस पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आणून फिरोज शेख यांनी महत्वाची भुमिका बजावली होती,येणाऱ्या 2022 च्या निवडणुकीत फिरोज शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वतःहा निवडणूक लढवतात की यंदाही किंगमेकर चीच भुमिका बजावतात हे येणाऱ्या काळात नक्कीच कळेल.

फिरोज शेख सारख्या चांगल्या कार्यकर्त्या ने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे अशी चर्चा सध्या लोणावळा शहरातील राजकारण्यांमध्ये सुरु आहे.