Sunday, July 20, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडगुंडगे येथे "श्री सोमजाई मातेचा उत्सव "मोठ्या उत्साहात साजरा !

गुंडगे येथे “श्री सोमजाई मातेचा उत्सव “मोठ्या उत्साहात साजरा !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली ३५ वर्षे कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील श्री सोमजाई मातेचा उत्सव मंदिरात यावर्षी देखील मंडळाचे संस्थापक तथा मा. उपनगराध्यक्ष लालधारी शेठ पाल यांच्या मार्गदर्शनाखाली ” उत्तर भारतीय दुर्गा मित्र मंडळ ” यांच्या वतीने दि. १४ व १५ जानेवारी २०२४ रोजी ” मकर संक्रातीच्या ” मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . श्री राम चरित्र मानस अखंड रामायण पाठ , होम हवन व श्री सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात आले होते . या निमित्ताने महाप्रसादाचे व अन्नदान देखील करण्यात आले . कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे येथील ” श्री सोमजाई माता ” हि स्वयंभू नवसाला पावणारे देवस्थान आहे . मुंबई , पुणे , ठाणे , उल्हासनगर , रायगड तसेच कर्जत तालुक्यातील अनेक भाविक त्याचप्रमाणे गुंडगे परिसरातील नागरिक , महिला वर्ग मातेचे दर्शन घेण्यासाठी , नवस फेडण्यासाठी उपस्थिती दर्शवितात.

उत्तर भारतीय दुर्गा मित्र मंडळाचे संस्थापक तथा माजी उपनगराध्यक्ष लालधारीशेठ पाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव गेली ३५ वर्षे येथे साजरा होत आहे . यावेळी ” पंकज पुजारी बनारसी व प्रिती पाल ” यांचा पारंपारीक भोजपुरी बिरहा का सुपरहिट गाण्यांचा मुकाबला आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उत्तर भारतीय दुर्गा मित्र मंडळाचे संस्थापक तथा मा.उपनगराध्यक्ष लालधारी शेठ पाल , अजय पाल , विजय पाल , मंडळाचे अध्यक्ष रामचेत यादव , पवन पाल – कार्याध्यक्ष , संजय पाल – उपाध्यक्ष , शितला पाल , बलराम पंडित , नेता शर्मा , सूरजबली यादव , तिरथ यादव , जयादेवी लालधारी पाल – अध्यक्षा महिला मंडळ , सुनिता यादव , गिरिजा यादव , गिता पाल , रॉली पाल , आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यांच्या वतीने कर्जत नगर परिषदेचे नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी , नगरसेवक उमेश गायकवाड , पाणी पुरवठा सभापती सौ. वैशाली मोरे , प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव , नगरसेविका पुष्पा दगडे , नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , संकेत भासे , गटनेते नितीन दादा सावंत , बैजू घुमरे , मा. नगरसेवक दिपक मोरे , मा. सभापती पंढरी राऊत , बाबू घारे , प्रफुल्ल विचारे – मा. सरपंच वावर्ले , मा. नगरसेविका बिनीता घुमरे , मा. नगराध्यक्ष राजेश दादा लाड , पालिका कर्मचारी रवि लाड , त्याचप्रमाणे अनेकांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.

यावेळी अजय व विजय पाल मित्र मंडळ कार्यकर्त्यांनी हा उत्सव यशस्वी होण्यासाठी अपार मेहनत घेतली . या उत्सवास पाल समाज व उत्तर भारतीय नागरिक , महिला वर्ग , गुंडगे ग्रामस्थ मंडळ , राजमाता जिजाऊ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी मंदिराचे पुजारी मोरेश्वर म्हामुनकर , अरविंद म्हामुनकर , यांनी सर्व भाविकांना दर्शन घेण्यास व प्रसाद देण्यास मदत केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page