![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुका आदिवासी – कामगार – कष्टकरी – गोर गरीब – अन्यायग्रस्त नागरिकांना – हातावर पोट भरणारे बारा बलुतेदारांचं गाव . या सर्वांचे न्याय – अधिकार मिळविण्यासाठी नेहमीच झगडत रहावे लागत असल्याने हा अधिकार पुन्हा प्राप्त करण्यासाठी शासकीय लढाई लढण्यास ” दंड थोपटून ” उभा रहाणारा लढवय्या आंदोलनाच्या माध्यमातून कर्जतकर नागरिकांच्या नजरेत नेहमीच चर्चेत राहिला आहे .कर्जत पोलीस ठाण्यापासून कर्जत तहसील कचेरी पर्यंत तर वीज कंपनीच्या समस्येपासून ते नगर पालिकाच्या गलथान कारभारा विरोधात तर इतर ठिकाणी देखील नेहमीच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ” क्रांतिकारी धडक ” देणारे वंचित बहुजन आघाडीचे ” डॅशिंग नेतृत्व ” कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे हेच नाव सर्वांच्या मुखात येईल.
न्याय मिळण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे डॅशिंग नेतृत्व धर्मेंद्रदादा गणपत मोरे हे कर्जत तालुक्यातील बीड या गावाचे . वडील गणपत मोरे हे शिक्षक होते त्यामुळे धर्मेंद्रदादा मोरे यांच्यावर छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकरी विचार धारेचे संस्कार त्यांच्या मनावर लहानपणीच बिंबवले गेले . मोठे वडील बंधू दिपक दादा मोरे हे भारिप बहुजन महासंघ रायगड जिल्हाध्यक्ष तर आता वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य असल्याने ” वंदनीय बाळासाहेब आंबेडकर ” यांचे निकटवर्तीय असून त्यांच्या मुशीतच धर्मेंद्रदादा मोरे देखील तयार होऊन राजकीय क्षेत्रात कार्य करून उभारी घेत असताना दिसत आहेत , तर नामांकित ऍड. कैलास मोरे हे त्यांचे मधले बंधू असल्याने कायद्याचे ज्ञान देखील घरातूनच मिळाल्याने सर्व समस्यांची लढाई ते पेलून ” लीलया ” जिंकतात . तालुक्यातील शेतकरी बांधवांचे प्रश्न असो की , राजनाला प्रकरण , भात खरेदी विक्री तक्रारी , अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना झालेल्या शेतीच्या नुकसानीत भरपाई मिळण्यासाठी केलेले प्रयत्न , विजेच्या समस्येबाबत , वाढीव बिलाबद्दल , वीज कंपनीच्या अधिकारी वर्गाला विचारलेला जाब , महापुरुषांचे स्मारक , डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन प्रकरण , सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल अपशब्द लिहिणा-यांना शिकविलेला धडा व त्यासाठी पोलीस यंत्रणेला गुन्हे नोंद करण्यास केलेले प्रयत्न , कोरोना काळात गोरगरीब नागरिकांना केलेली अन्न धान्यांची व गरजू वस्तू वाटप करून जपलेली सामाजिक बांधिलकी , कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विषयी सोई सुविधा मिळण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांसाठी केलेले जिकरीचे प्रयत्न , पालिकेच्या वाढीव घरपट्टी – पाणीपट्टी विरोधात दिलेली झुंज , तर इतर न्याय हक्कासाठी केलेली उपोषणे , अन्याय अत्याचाराविरोधात व परिसरातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी त्यांना दिलेली साथ , गुन्हेगारी क्षेत्राचा बिमोड करण्यासाठी अत्याचारग्रस्ताना केलेली मदत , या सर्वच क्षेत्रात त्यांची कार्य करण्याची असलेली धडपडीमुळे सर्वच शासकीय , खाजगी , व अन्य संघटन क्षेत्रात त्यांचा ” आदराने दबदबा ” आहे.
वंचित बहुजन आघाडीचे कर्जत ता.अध्यक्ष पदावर काम करत असताना पक्षासाठी केलेले भरीव कार्य , केलेली आंदोलने , मोर्चे यांत त्यांचा सहभाग आग्रही असल्याने अल्पावधीतच पक्षाला त्यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागापर्यंत नेऊन या पदाला साजेसा न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
आज गुरुवार दिनांक ” १८ जानेवारी २०२४ ” या दिवशी त्यांचा वाढदिवस असून आज देखील समाजपयोगी कार्यक्रमाने तसेच अनेक सामाजिक उपक्रम करून सामाजिक बांधिलकी जपत हा वाढदिवस पक्षातील पदाधिकारी , कार्यकर्ते , मित्र मंडळी , आप्तेष्ट यांच्या संपर्कात राहून साजरा करतात. वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील आयुष्य सुखाचे , समाधानी व भरभराटीचे जावो , त्यांचे आरोग्य सदाबहार राहो , हिच ईश्वर चरणी प्रार्थना !