Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपेण अर्बन बँक संघर्ष समितीने महायुतीचे उमेदवार " आमदार महेंद्र शेठ थोरवे...

पेण अर्बन बँक संघर्ष समितीने महायुतीचे उमेदवार ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांना दिला जाहीर पाठिंबा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली १४ वर्षे ” खितपत ” पडलेल्या पेण अर्बन बँकेच्या खातेदारांना आमदार नसताना व झाल्यावर ही सातत्याने त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून मदतीचा हात तर ” मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ” यांची बैठक आयोजित करून आशेचा ” किरण ” दाखवणारे कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना या मतदार संघातील पेण अर्बन बँक समितीने या निवडणुकीत आपला ” जाहीर पाठिंबा ” दर्शविला असल्याने कर्जत मतदार संघात असणाऱ्या हजारो ठेवीदार व खातेदार आता त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांचे पारडे जड झाल्याचे चित्र येथे दिसत आहे.

मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १०.०० वाजता पेण अर्बन बँक संघर्ष समिती व ठेवीदारांच्या संघटनेने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे . पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या हक्कांसाठी व त्यांचे अधिकार तसेच पैसे परत मिळवून देण्यासाठी आमदार थोरवे यांनी केलेल्या प्रयत्नांची समितीने प्रशंसा केली आहे. संघर्ष समितीने आपल्या निवेदनात सांगितले की, आमदार थोरवे हे २०१९ पासून पेण अर्बन बँक संघर्ष समिती व ठेवीदारांच्या पाठीशी तन, मन, धनाने खंबीरपणे उभे आहेत.

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बरोबर महत्वपूर्ण बैठक झाली असून, बँकेच्या ठेवीदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील आहेत. संघर्ष समितीने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, भविष्यातही आमदार थोरवे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतील. पेण अर्बन बँक संघर्ष समितीचे सदस्य आणि ठेवीदारांनी ठाम विश्वास व्यक्त करत, आमदार महेंद्र थोरवे यांना आपल्या पाठिंब्याची जाहीर घोषणा केली आहे , व येणाऱ्या विधानसभेत आमदार महेंद्र थोरवे हेच आमदार होतील व कर्जत खालापूरचे नामदार देखील होतील , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी पेण अर्बन बँक समितीचे पदाधिकारी समवेत आमदार महेंद्र शेठ थोरवे , जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर आदी उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page