Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडअध्यक्षा सौ.पूजा सुर्वे यांच्या पुढाकाराने स्तुत्य उपक्रम..

अध्यक्षा सौ.पूजा सुर्वे यांच्या पुढाकाराने स्तुत्य उपक्रम..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या छोट्याश्या संसारात रममाण झालेल्या आधुनिक स्त्रीला , उंबरठा ओलांडून जरा विसावा मिळवून समस्यांना तोंड देण्यासाठी प्रसंगी रण रागिणी बनून कुटुंबाचे रक्षण करण्या ” राजमाता जिजाऊंचे ” दर्शन घेवून स्फूर्ती मिळावी , अशा उद्दात्त हेतूने नेहमीच महिलांचे सक्षमीकरण होणे , हा एकमेव उद्दिष्ट उराशी बाळगून शहरापासून ग्रामीण भागात स्फूर्तिदायक कार्य करणाऱ्या ” राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या ” संस्थापक अध्यक्षा ऍड. सौ. पूजा सुर्वे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पाचाड – रायगड येथील समाधी स्थळावर इतिहास कालीन वेशभूषा परिधान करून त्यांच्या समाधी स्थळाचे दर्शन आपल्या परिसरातील तब्बल ६० रणरागिणी यांना घेवून वंदन केले . त्यांच्या या ” स्फूर्तिदायक ” कार्याचे कौतुक कर्जत तालुक्यात मोठ्या जल्लोषात होत आहे.

राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून शुक्रवार दि. १२ जानेवारी २०२४ रोजी ” जिजाऊ जयंती ” निमित्त कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास ६० पेक्षा जास्त महिलांना राजमाता जिजाऊंच्या पाचाड येथील समाधी स्थळा समोर नतमस्तक होण्यासाठी नेले होते . यावेळी राजमाता जिजाऊ फाऊंडेशनच्या महिलानीं ” राष्ट्रमाता जिजाऊ ” यांना वंदन करुन घोषणा दिल्या . तसेच पाचाड येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील ” राजमाता जिजाऊ फाऊंडेशन व तारा राणी ब्रिगेड ” यांच्या संयुक्तपणे घेण्यात आले.
या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पोवाडा , एकपात्री , जिजाऊ वंदना , छत्रपती शिवाजी महाराजां वरिल गाणी व महिलांना उपदेशपर भाषणे आदींचे सादरीकरण करण्यात आले . यांत पळसदरी ग्रामपंचायत मधील श्रेयस देशमुख याने ” बाळ शिवबा ” ची भूमिका साकारली , सुवर्णा सुर्वे , कांचन देशमुख यांनी जिजाऊ माता साकारले तर चि. वंदना यांनी जिजाऊ चे गाणे सादर केले व पल्लवी कनोजे व तिच्या सहकारी यानीं सुंदर नृत्याचे सादरीकरण केले . यावेळी सर्व महिलांनी छत्रपतींच्या पावन भूमीत त्यांच्या पद स्पर्शाने स्फूर्ती मिळणाऱ्या अभेद्य रायगड किल्ला व त्यांचे दर्शन घेवून पाहिला , यावेळी महिलांनी ” न भूतो – न भविष्यती ” असा उत्स्फूर्त सहभाग दाख़विला.

या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन ” जिजाऊ फाऊंडेशन ” च्या अध्यक्षा ऍड. सौ . पूजा सुर्वे अणि त्यांच्या महिला सहकारी यांनी केले . या केलेल्या उपक्रमाचे रायगड जिल्ह्यासह कर्जत – खालापूर मतदार संघात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page