राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर डॉक्टर सेल अध्यक्षपदी डॉ. डॉली अगरवाल यांची नियुक्ती... - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home पुणे लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर डॉक्टर सेल अध्यक्षपदी डॉ. डॉली अगरवाल यांची नियुक्ती…

राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर डॉक्टर सेल अध्यक्षपदी डॉ. डॉली अगरवाल यांची नियुक्ती…

0

लोणावळा : लोणावळा शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर्स सेल अध्यक्ष पदी डॉ. डॉली अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार , राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती फौजियाताई खान , खासदार सौ . सुप्रियाताई सुळे , अजितदादा पवार, जयंतराव पाटील , सौ . रुपालीताई चाकणकर व मावळचे आमदार सुनिल ( आण्णा ) शेळके यांना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना बांधण्यासाठी डॉ डॉली या नेहमी प्रयत्नशील राहणार तसेच पक्ष बळकटीसाठी व पक्ष मजबुत करण्यासाठी पक्षाची ध्येय – धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या कार्यरत असणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे .

याबाबत शहर कार्याध्यक्षा सौ . संयोगिता नामदेव साबळे, शहर अध्यक्षा सौ . उमा राजेश मेहता, तालुका महिला अध्यक्षा सौ . दिपाली संदीप गराडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रक प्रदान करण्यात आले.

डॉ. डॉली अगरवाल यांचे आरोग्य क्षेत्रातील कार्य अप्रतिम आहे. त्यांनी मागील कोरोना काळात सलग दोन वर्ष कोरोना सेंटर व कोरोना बाधित होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची घरोघरी जाऊन देखभाल व सेवा केली. त्यांच्या या अप्रतिम कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली असून त्यांची लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेल अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page

Exit mobile version