श्री एकविरा जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी ट्रस्ट यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा पार पडला… - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home पुणे लोणावळा श्री एकविरा जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी ट्रस्ट यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा पार...

श्री एकविरा जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी ट्रस्ट यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा पार पडला…

0
कार्ला : श्री एकविरा जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी ट्रस्ट कार्ला यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा पार पडला यामध्ये 15 जोडपी विवाह बद्ध झाली आहेत. दि.26 रोजी श्री दुर्गा परमेश्वरी मंदिराच्या परिसरात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरूवात सकाळी साखरपुड्याने झाली. यावेळी माजी सभापती विठ्ठल शिंदे, राजाराम शिंदे, ज्ञानदेव शिंदे, नारायण ठाकर, गणेश धानिवले उपस्थीत होते. हळदीचा कार्यक्रम नवरदेवांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
विशेष म्हणजे या विवाहसोहळ्यात लग्न करणा-या प्रत्येक वधूस एकतोळा सोन्याचे मंगळसुत्र, कानातील कर्णफुले पायातील पैंजन, जोडवी, नथनी व कन्यादान म्हणून संसारउपयोगी वस्तु झाल, शिलाई मशिन देण्यात आली. साखरपुडा, हळदीच्या साड्या लग्नाला लागणारा वर राजास लग्नाचा सुट व वधूसाठी शालु 15 याचबरोबर प्रत्येक वरांना वधूनां मनगठी घड्याळ तसेच संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या.
या विवाह समारंभास मावळचे आमदार सुनिल शेळके, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक विश्वजीत बारणे, मावळ भूषण ह भ प तुषार महाराज दळवी, गरुड झेप अकॅडमि चे प्रा डॉ. सुरेश सोनवणे, सरदार पाटील, प्रा विजय मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, शरद पवार गट अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, सरपंच दिपाली हुलावळे, जि सदस्य बाबुराव वायकर, मावळ माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, शिवसेना तालुका प्रमुख अशिष ठोंबरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष यशवंत मोहळ, शिवाजी असवले, सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, सुदर्शन खांडगे, अमोल भेगडे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे हे विवाहसोहळ्याचे बारावे वर्ष असून सोहळ्याचे संयोजन विवाह सोहळा समिती अध्यक्ष बाळासाहेब येवले, कार्याध्यक्ष राजु देवकर, उपाध्यक्ष अमोल हुलावळे,नवनाथ मालुसरे, मदन नाणेकर, संस्थापक भरत मोरे, दिपक हुलावळे, मिलिंद बोत्रे,मानद अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, किरण हुलावळे, सुरेश गायकवाड, नंदकुमार पदमुले,रघूनाथ मराठे, गुलाब तिकोणे, अजय शिराली,संजय देवकर, जितेंद्र बोत्रे, संभाजी येवले,मधुकर पडवळ, बबनराव माने, तानाजी पडवळ, किरण येवले, वसंतराव माने, भरत येवले, मारुती येवले, संजय देवकर, अरुण भानुसघरे, संभाजी भानुसघरे, मनोज देशमुख, प्रकाश आगळमे, रोहिदास हुलावळे, सागर जाधव, गणेश पडवळ, संतोष भानुसघरे, सुरेश कडु, संजय देवकर यांच्यासह कार्ला परिसरातील ग्रामस्थ आदींनी केले होते.

You cannot copy content of this page

Exit mobile version