" क्रांतीकारी जयहिंद सेना " पक्षाकडून मावळ लोकसभा मतदार संघातून " माऊली " उर्फ यशवंत पवार रिंगणात ! - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home महाराष्ट्र रायगड ” क्रांतीकारी जयहिंद सेना ” पक्षाकडून मावळ लोकसभा मतदार संघातून ” माऊली...

” क्रांतीकारी जयहिंद सेना ” पक्षाकडून मावळ लोकसभा मतदार संघातून ” माऊली ” उर्फ यशवंत पवार रिंगणात !

0

” दासभक्त ” असल्याने विजयी माझाच होणार माउलींनी व्यक्त केले मत.

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मावळ लोकसभा मतदार संघातून ” क्रांतीकारी जयहिंद सेनेकडून ” कर्जत शहरात रहाणारे जनहित सेवा संस्था या मानव हक्क व माहिती अधिकार जनजागृती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ” यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली ” हे निवडणूक रिंगणात असल्याने हि निवडणुक आत्ता चुरशीची झाली आहे.
” दासभक्त ” असलेले माऊली संपूर्ण मावळ लोकसभा मतदार संघात प्रसिद्ध असून अर्धपोटी – अन्यायग्रस्त – सामान्य – अंग मेहनती – कष्टकरी – वंचित – पिडीत – शोषित – उपेक्षित – स्वाभिमानी – दलित – आदिवासी – बहुजन वर्ग – महिला भगिनी असलेल्या घटकांची सदैव सेवा करण्यात त्यांचा हातखंडा असल्याने व अनेकांना दैनंदिन जीवनात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध व त्यांच्या समस्या शासकीय दरबारी आवाज उठवून सोडविण्यासाठी जीवाची बाजी करणारे ” माऊली ” यांचा जनाधार मोठ्या प्रमाणात असल्याने या मावळ मतदार संघात ” बाजी मारून माझ्याच अंगावर विजयाचा गुलाल उधळणार ” असे मत क्रांतीकारी जयहिंद सेनेचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार यशवंत उर्फ ” माऊली ” पवार यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारी गाथेच्या राजवटीत ” नेताजी सुभाषचंद्र बोस ” यांच्या योगदानातून त्यांनी भारतीय जनतेला मुक्त करण्यासाठी केलेल्या संघर्षातून निर्माण झालेल्या उर्जेतून ” क्रांतिकारी जयहिंद सेनेचा ” जन्म झाला असून ब्रिटिशांची राजकीय पक्षात फूट पाडून राज्य करा , या खालच्या पातळीचे गलिच्छ राजकारण पक्ष – धर्म – जात – पंथ – प्रादेशिक भाषा यांवर राजकीय कारवाया आजच्या या राजकारणात दिसत असून हि भ्रष्ट आणि अन्यायकारक वृत्ती आपल्या देशाच्या राष्ट्रीय अखंडतेला आणि एकात्मतेसाठी अत्यंत घातक असून देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी आणि या देशातील रहाणाऱ्या नागरिकांच्या विरोधात काम करणाऱ्या फुटीरतावादी आणि भ्रष्ट शक्तिविरोधात लढा देण्याच्या उद्देशाने स्थापन झाली असून आपल्या देशातील तरुण पिढी आणि महिला सदृढ बनविण्यासाठी आपण या देशाच्या शत्रू विरोधात या मोहिमेत सामील होऊन आपले बहुमूल्य मत मला द्याल , असे आवाहन यशवंत उर्फ माऊली पवार यांनी मतदारांना केले आहे.

” ना गलत करेंगे – ना करने देंगे ” अशा ज्वलंत विचारांचा पक्ष असलेला ” क्रांतीकारी जयहिंद सेना ” या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड . रामचंद्र नारायण कच्छवे यांच्या प्रेरणेने मी मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरलेला असून अन्याय – भ्रष्टाचार – भयमुक्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी व जनतेला अन्न – वस्त्र – निवारा देण्यासाठी , महागाई मुक्त करण्यासाठी , मोफत वीज , पाणी , शिक्षण , घरपट्टी देण्यासाठी , कामगारांना न्याय देण्यासाठी , प्रदूषण मुक्त परिसर करण्यासाठी , कायम स्वरुपी कामगार भरतीचा आवाज उठविण्यासाठी व महिलांना न्याय देण्यासाठी , मराठा आरक्षण मिळविण्यासाठी संसदेत ” माऊली ” सारख्या गोर गरीबांना अहोरात्र मदत करणाऱ्या कार्यकर्त्याची व दासभक्ताची गरज असून मतदारांनी मला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन , क्रांतीकारी जयहिंद सेना या पक्षाच्या व मराठा समाजाच्या उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन यशवंत उर्फ माऊली पवार यांनी मतदार राजाला केले आहे.

You cannot copy content of this page

Exit mobile version