खोपोली नगरपालिकेच्या वतीने दोन दिवस "आरोग्य सेवा तुमच्या दारी" - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home महाराष्ट्र रायगड खोपोली नगरपालिकेच्या वतीने दोन दिवस “आरोग्य सेवा तुमच्या दारी”

खोपोली नगरपालिकेच्या वतीने दोन दिवस “आरोग्य सेवा तुमच्या दारी”

0

खोपोली -दत्तात्रय शेडगे

खोपोली शहरात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शनिवार दि. 1 व 2 ऑगस्ट 2020 रोजी नगरपरिषद खोपोलीच्या वतीने “आरोग्य सेवा तुमच्या दारी” या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय आरोग्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून घरोघरी जावून सर्वांची आरोग्य तपासणी होणार आहे.

खोपोली शहरातील सर्वसामान्य नागरिक पावसाळ्यात आजारी असल्याने भीतीपोटी दवाखान्यात जात नाहीत त्यामुळे आरोग्य सेवा मोहिम नगरपालिकेच्या माध्यमातून राबवून नागरिकांमधून कोरोनाची भिती घालविण्यासाठी आरोग्य सेवा मोहीम राबविण्यासंदर्भात नागरिकांना माहिती पोहचवावी यासाठी नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी नगराध्यक्षाच्या दालनात पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी मुख्याधिकारी सुरेखा भणगे,आरोग्य सभापती वैशाली जाधव, गटनेते सुनिल पाटील,नगरसेवक मोहन औसरमल,राजू गायकवाड,शिवसहकर सेना शहर संघटक हरिश काळे उपस्थित होते.

शहरातील सर्वच प्रभागातील कुटूंबाचा टाटा पालिकेकडे असून खोपोली डॉक्टर्स असोसिएशन आणि शिक्षक,आरोग्य विभागाची २८ टिम कडून सर्वच घरांच्या दरवाजामध्ये जावून कुटूंबातील कोणी सदस्याला सर्दी,खोकला,ताप आहे का ? असेल तर खालापूर तालुका वैदयकीय डॉ.शहा यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार करण्यात येईल सोम्य लक्षणे असतील तर के.एम.सी काँलेज मधील कोव्हीड सेंटर मध्ये उपचार देण्यात येतील तसेच कोव्हीड टेस्ट करण्यासाठी खोपोलीतील रूग्णांना कमीत कमी पैसे आकरण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी यांच्या पाठपुरावा करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगत खोपोलीत वयोवृद्धांसाठी मोफत रिक्षांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

तर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मुख्याधिकारी,सर्व सभापती,नगरसेवक यांनी सहकार्याची भूमिका घेत लोकांसाठी आरोग्य सेवा उपक्रम आयोजित केले असून सर्व नागरिकांनी सहकार्य करा असे अवाहन नगराध्यक्ष सुमन औसरमल व आरोग्य सभापती वैशाली जाधव यांनी केले आहे.

यावेळीपत्रकार परिषदेत नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी नगराध्यक्षाच्या दालनात पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी मुख्याधिकारी सुरेखा भणगे,आरोग्य सभापती वैशाली जाधव, गटनेते सुनिल पाटील,नगरसेवक मोहन औसरमल,राजू गायकवाड,शिवसहकर सेना शहर संघटक हरिश काळे दिसत आहेत.

You cannot copy content of this page

Exit mobile version