माथेरानच्या पर्यटनावर कोरोनाचा कोणताही प्रभाव नाही..पर्यटकांची नेहमी प्रमाणे हजेरी... - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home महाराष्ट्र रायगड माथेरानच्या पर्यटनावर कोरोनाचा कोणताही प्रभाव नाही..पर्यटकांची नेहमी प्रमाणे हजेरी…

माथेरानच्या पर्यटनावर कोरोनाचा कोणताही प्रभाव नाही..पर्यटकांची नेहमी प्रमाणे हजेरी…

0


पर्यटक घेतायत मनमोकळा स्वच्छ व निसर्गाचा आनंद…

माथेरान-दत्ता शिंदे.

राज्यात वाढू लागलेली कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे सर्वत्र पुन्हा एकदा लॉक डाऊन चे सावट असताना माथेरान ला मात्र पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.     

राज्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेनदिवस वाढत असताना माथेरानचे प्रशासन व व्यावसायिकांच्या सावधगिरीमुळे येथील पर्यटन मात्र सुरक्षित झाले आहे.  त्यातच येथील प्रदूषणमुक्त वातावरण सध्याच्या काळात सर्वांसाठी पोषक असल्याने माथेरानमध्ये पर्यटकांची रीघ लागलेली दिसून येत आहे.आलेले पर्यटक व स्थानिक ही सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत असल्याने हे पर्यटनस्थळ कोरोनामुक्त पर्यटन स्थळ आहे.     

               

माथेरान मध्ये गुलाबी थंडी चे दिवस असल्याने येथील वातावरण पर्यटनास पोषक आहेच पण सध्या च्या काळामध्ये येथील कृत्रिम ऑक्सिजन च्या ऐवजी लोकांना शुध्द हवेसाठी माथेरान इतके सुरक्षित ठिकाणी मुंबई व पुणे या शहरांपासून जवळ दुसरे सापडणार नाही त्यातच कोरोनाचा धोका लक्षात घेता माथेरान अधिक सुरक्षित असल्याने पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.

माथेरान पालिकाही येथील पर्यटन सुरक्षित राहावे ह्या करिता प्रयत्नशील असून घरोघरी जाऊन ध्वनीशेपकाद्वारे सॅनिटायजर व मास्क वापरण्याचे आव्हाहन करीत असताना कुठेही दुर्गंधी होणार नाही ह्याकडे स्वतः मुख्याधिकारी श्री प्रशांत जाधव जातीने लक्ष ठेऊन आहेत.

तर पालिकेचे कर्मचारीही येणाऱ्या पर्यटकांना मास्क वापरा असा संदेश देत असल्याने पर्यटक ही सुरक्षिततेच्या बाबतीत आनंदी दिसून येत आहेत तसेच माथेरानचे पोलीस अधिकारीही येथील व्यावसायिकांना भेट देऊन सुरक्षिततेचे नियम पाळले जात असल्याची खात्री करून घेत आहेत त्यामुळे येथील पर्यटन सुरक्षित असल्याने येथे ह्या दिवसातही पर्यटक मोकळी हवा घेत आहेत .

You cannot copy content of this page

Exit mobile version