रविवार पासून भिसेगाव- गुंडगे परिसरात पाण्याचे वेळापत्रक बिघडले ! - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home महाराष्ट्र रायगड रविवार पासून भिसेगाव- गुंडगे परिसरात पाण्याचे वेळापत्रक बिघडले !

रविवार पासून भिसेगाव- गुंडगे परिसरात पाण्याचे वेळापत्रक बिघडले !

0

महिला वर्गांत संतापाची लाट…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव – गुंडगे प्रभागात रविवार दि.१६ एप्रिल पासून पाण्याचे वेळापत्रक बिघडले असून येणारे पाणी देखील कमी असल्याने महिला वर्गांत संतापाची लाट पसरली आहे . एप्रिल महिना अजून सरला नसताना आताच पाण्याचे हे हाल असतील तर पुढे मे महिन्यात काय होणार , असा संतापजनक सवाल देखील महिला वर्ग करताना दिसत आहेत.

कर्जत नगर परिषदेच्या पाणी विभागाच्या अभियंता पासून कर्मचारी पर्यंत पाण्याच्या नियोजनावर कुणाचेच अंकुश राहिले नाही , त्यामुळे प्रभागात पाणी टंचाई तर सकाळी येणारे पाणी दुपारी येत असल्याने महिला वर्गांचे दैनंदिन कामांचे देखील वेळापत्रक बदलत आहे . एखादी महिला बाजारहाट करण्यास गेल्यावर पाणी आल्यावर त्या कश्या पाणी भरणार , तर कमी प्रेशरने येत असलेले पाणी पुरेसे मिळत नसल्याने ऐन गर्मीत परिसरात संतापाचे वातावरण आहे . आज प्रभागात पाणी आले नाही , किंवा उशिरा येईल , कारण काय तर आज लाईट नव्हती , उद्या काय तर अमुक परिसरात पाणी पहिले सोडणार , म्हणून भिसेगाव येथे पाणी लेट , परवा काय तर , मेन पाईप च काम निघाले , अशी एक ना अनेक कारणे सोशल मीडियावर पाणी यंत्रणेवाले पाठवीत असल्याने , जर पालिकेच्या पाणी यंत्रणेला नागरिकांना पाणी पुरविता येत नसेल ,नागरिकांच्या हिताची कामे होत नसतील तर संबंधित मुख्याधिकारी – सभापती – पाणी अभियंता – कर्मचारी – यांच्या केबिन बंद करा , असा संतापजनक सूर महिलांमध्ये चर्चा होऊन निघत आहे.

परिसरात वाढते नागरिकीकरण व लोकसंख्येचा विचार करता वीस वर्षांपूर्वीची पाणी योजनेचे पाणी आता कसे पुरविता येईल , ? असा यक्षप्रश्न उपस्थित होत असताना वाढीव पाण्याच्या साठवण टाक्या कर्जत नगर परिषद हद्दीत वाढविणे गरजेचे असून ,या मुख्य समस्येकडेच दुर्लक्ष होताना दिसत आहे.

You cannot copy content of this page

Exit mobile version