रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचे 93 हजाराचे दागिने लंपास.. - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home पुणे तळेगाव रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचे 93 हजाराचे दागिने लंपास..

रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचे 93 हजाराचे दागिने लंपास..

0

तळेगाव दाभाडे – रिक्षातून प्रवास करत असलेल्या महिलेसोबत प्रवास करून तीन अनोळखी महिलांनी महिलेच्या नकळत पर्समधून 93 हजारांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार प्रकार शुक्रवार दि.22 रोजी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास तळेगाव – चाकण रोडवर इंद्रायणी कॉलेज समोरील बस थांब्याच्या जवळपास घडला.

जयश्री जयवंत शिगवणकर ( वय 52 , रा . तळेगाव दाभाडे ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तीन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी शुक्रवारी दुपारी पावणे पाच वाजता तळेगाव चाकण रोडवरील इंद्रायणी कॉलेज समोरील बस थांबा ते तळेगाव स्टेशन चौक या दरम्यान रिक्षातून प्रवास करत होत्या . त्यावेळी तीन महिला फिर्यादीच्या रिक्षात बसल्या . त्या तीन महिलांनी फिर्यादीच्या नकळत त्यांच्या पर्समधून 43 ग्रॅम वजनाचे 93 हजारांचे सोन्याचे दागिने हातचलाखी करून चोरून नेले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page

Exit mobile version