वांद्रे येथे महिला दिनानिमित्ताने आरोग्य तपासणी..१०४ महिलांनी घेतला लाभ.. - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home पुणे मुळशी वांद्रे येथे महिला दिनानिमित्ताने आरोग्य तपासणी..१०४ महिलांनी घेतला लाभ..

वांद्रे येथे महिला दिनानिमित्ताने आरोग्य तपासणी..१०४ महिलांनी घेतला लाभ..

0


वांद्रे ग्रामपंचायत आणि सेवा सहयोग फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम…


मुळशी.महिला दिनाचे औचित्य साधत ग्रुप ग्रामपंचायत वांद्रे आणि सेवा फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले.मुळशी तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली,यात महिलांसाठी हिमोग्लोबिन, रक्त गट, मधुमेह, सांधे दुःखी, आणि विविध आजारांची तपासणी करून औषध देण्यात आले.


हे आरोग्य शिबीर पार पाडण्यासाठी टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट मुळशी,भारतीय विद्यापीठ समाजविज्ञान केंद्र पुणे, प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवणे, या संस्थांनी विशेष सहकार्य केलेे.


यावेळी राष्ट्रवादीचे नेते धूला कोकरे, सोमनाथ कुलकर्णी, उमेश सावंत, वांद्रे ग्रामपंचायतच्या सरपंच तथा राष्ट्रवादी कॉग्रेस महिला मुळशी तालुका अध्यक्ष दीपाली विनायक कोकरे, उपसरपंच विष्णू शिंदे, सुमन खराडे, विनायक कोकरे, संतोष गोरे, विकास खराडे, विकास हिलम,सदाशिव साळुंखे, विशाल पडवळ, जाई मरगले आदीसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page

Exit mobile version