गुढीपाडवा व नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात भव्य रॅलीचे आयोजन… - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home पुणे लोणावळा गुढीपाडवा व नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात भव्य रॅलीचे आयोजन…

गुढीपाडवा व नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात भव्य रॅलीचे आयोजन…

0
लोणावळा : गुढीपाडवा व हिंदू नववर्षांच्या स्वागतासाठी लोणावळ्यात हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसर यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दिड हजार दुचाकी गाड्यांवरुन तीन ते साडेतीन हजार हिंदू बंधू भगिनी या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
लोणावळ्यातील पुरंदरे विद्यालयाच्या मैदानाहून ही शोभायात्रा सुरु होऊन खंडाळा येथे समारोप करण्यात आला. शोभायात्रा सुरू होण्यापूर्वी हिंदू समितीला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
शोभायात्रेमध्ये सर्वात पुढे डिजे त्यांनतर प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची वेशभूषा परिधान केलेल्या तरुणांचा रथ, त्यानंतर दुचाकी वरील महिला, त्या मागोमाग दुचाकीवरील पुरुष व युवक, त्यामागे प्रभू श्रीराम यांची प्रतिमा व आयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेला रथ तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ व सर्वात मागे दुसरा डिजे असे या शोभायात्रेचे स्वरुप होते. पुरंदरे मैदानाहून सदरची शोभायात्रा ही इंद्रायणी पुला मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयचंद चौक, मावळा पुतळा चौक, भगवान महावीर चौक या मार्गे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाने नारायणी धाम पोलीस चौकी येथून तुंगार्ली गावात गेली,तेथून इंद्रायणी नगर येथून फिरून अंबरवाडी गणपती मंदिर येथून पुन्हा राष्ट्रीय महामार्गावर येत खंडाळा येथे मार्गस्थ झाली. खंडाळा शनी मंदिराजवळ शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. समारोपाच्या ठिकाणी गुढीपाडवा या हिंदू नववर्ष दिनाचे महत्व व महात्म्य सांगण्यात आले.
अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. सकाळी साडे अकरा वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. सर्व दुचाकी वाहनांना भगवे ध्वज लावण्यात आले होते. प्रत्येकाने डोक्यावर भगवा फेटा तसेच भगव्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. तसेच पारंपारिक वेषभूषा केली होती. लहान मुले, महिला, युवक, तरुण व ज्येष्ठ सर्वच जण या शोभायात्रेत सहभागी झाले होते. मागील पंधरा दिवसांपासून हिंदू समितीच्या माध्यमातून या शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले होते.

You cannot copy content of this page

Exit mobile version