लोणावळा धरण 78 टक्के भरले ,धरणातून अनियंत्रित विसर्ग होण्याचा टाटा पॉवर कडून इशारा ! - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home पुणे लोणावळा लोणावळा धरण 78 टक्के भरले ,धरणातून अनियंत्रित विसर्ग होण्याचा टाटा पॉवर कडून...

लोणावळा धरण 78 टक्के भरले ,धरणातून अनियंत्रित विसर्ग होण्याचा टाटा पॉवर कडून इशारा !

0

लोणावळा : लोणावळा धरण 78 टक्के भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 1 तासात 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे . धरणातील पाणीसाठा 9.20 द.ल.घ.मी म्हणजेच 78.45 टक्के इतका झाला आहे . तर पाणलोट क्षेत्रात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात असल्याने धरण्याच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

त्यामुळे पुढील 24 तासांतच सांडव्यावरून अनियंत्रीत स्वरुपाचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याचा ईशारा लोणावळ्यातील टाटा पॉवर धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे . राज्यभरासह मावळ तालुक्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून या मुसळधार अतिवृष्टी पावसामुळे सर्वच धरणाच्या पाणी साठ्यात घसघशित वाढ होत आहे.

मावळ तालुक्यातील काही धरणे ही भरली असून परिसरात संततधार पाऊस सुरूच आहे . लोणावळ्यातील टाटा धरण 78 टक्के भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 1 तासात 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे.याच पार्श्वभूमीवर टाटा पॉवर धरण प्रशासनाने पुढील 24 तासांतच सांडव्यावरून अनियंत्रीत स्वरुपाचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याचा ईशारा दिला आहे . तरी नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये . आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत , अश्या सूचना टाटा पॉवर धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी दिल्या आहे.

You cannot copy content of this page

Exit mobile version