राज्यातील 4 नगरपंचायत,92 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीला स्थगिती... - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home महाराष्ट्र राज्यातील 4 नगरपंचायत,92 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीला स्थगिती…

राज्यातील 4 नगरपंचायत,92 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीला स्थगिती…

0

मुंबई : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत . ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे . त्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिताही आता लागू होणार नाही.

निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परित्रक देखील काढण्यात आले आहे . दरम्यान 8 जुलै रोजी निवडणूक आयोगाने पुणे , सातारा , सांगली , सोलापूर , कोल्हापूर , नाशिक , धुळे , नंदुरबार , जळगाव , अहमदनगर , औरंगाबाद , जालना , बीड , उस्मानाबाद , लातूर , अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या . मात्र या निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे . ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे . त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे .

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत , अशी भूमिका राज्यातील सर्वच नेत्यांनी घेतली होती . यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचाही समावेश होता . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस , नाना पटोले , पंकजा मुंडे , जयंत पाटील , धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी भूमिका घेतली होती . हे प्रकरण कोर्टात गेले त्यामुळे आता 19 तारखेनंतरच पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page

Exit mobile version