लोणावळ्यातील वाहतूक कोंडी संदर्भात महाराष्ट्र वाहतूक सेनेकडून शहर पोलीस स्टेशनला निवेदन ! - ASHTADISHA Covers Marathi News Nation wide
Home पुणे लोणावळा लोणावळ्यातील वाहतूक कोंडी संदर्भात महाराष्ट्र वाहतूक सेनेकडून शहर पोलीस स्टेशनला निवेदन !

लोणावळ्यातील वाहतूक कोंडी संदर्भात महाराष्ट्र वाहतूक सेनेकडून शहर पोलीस स्टेशनला निवेदन !

0

लोणावळा : लोणावळा शहरातील ट्राफीक जामच्या संदर्भात काही सूचना व उपाय योजना बाबत महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

लोणावळ्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही कठोर पावले उचलण्याची गरज आहे , विशेष आपले कर्मचारी फक्त लोणावळा लेक येथेच असतात परंतु त्यापुढे धबधबा याठिकाणी कोणीही नसल्यामुळे पर्यटक रोडवरतीच वाहने लावुन वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी जातात आपले पोलीस कर्मचारी माझ्या माहितीप्रमाणे किंवा एवढया वर्षाच्या अनुभवाप्रमाणे भुशी डॅम पर्यत आपला स्टाफ असणे गरजेचे आहे.

भुशी डॅम येथे पार्कीगसाठी पार्किंगवाले रोडच्या मध्ये उभे राहुन गाडया आडवुन पार्कींग मध्ये टाकण्यासाठी जबरदस्ती करतात त्यांना रोडवर उभे राहु न देणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे मोठया बसेस पुर्वी ऑक्झीलियन कॉन्हवेन्ट स्कुल रायवुड या ठिकाणी पार्किंग करत असत त्या भुशी डॅमच्या साईडला सोडल्यामुळे ट्राफीक जाम होते याचाहि आपण विचार करावा आपल्याकडे असलेले स्टाफ बरेच अंशी नवीन असल्यामुळे ट्राफीक नियोजन त्यांना जमत नाही.असे आमच्या निदर्शनास आले आहे.

माझी आपणांस विनंती आहे की , लोणावळा शहर मधुन बदली झालेले काही कर्मचारी व अधिकारी कामशेत , वडगांव , लोणावळा ग्रामीण या ठिकाणी आहेत . त्यांना आपण शनिवार रविवार या दिवशी बोलावले तर त्यांच्या अनुभवाचाहि ट्राफीक मोकळे करण्यासाठी आपल्याला फायदा होईल व याआधी वाहतूक विषयावर बैठक असली की आम्हाला बोलावले जायचे परंतु आता बरेच वेळा असे निदर्शनास आले आहे की विषय वाहतूकीचा असतो परंतु वाहतूक सेना म्हणुन आम्हाला त्याठिकाणी सांगितले किंवा बोलावले जात नाही आपण जर आम्हाला बैठकीला बोलावले असते तर बरेच विषयावर चर्चा झाली असती. लोणावळ्याकरांची या वाहतूक कोडींतून आपण सुटका करावी अशी विनंती महाराष्ट्र वाहतूक सेना पूणे जिल्हा अध्यक्ष महेश केदारी यांनी निवेदनामार्फत केली आहे.

You cannot copy content of this page

Exit mobile version