


नंदुरबार (प्रतिनिधी) : अँग्लो उर्दु हायस्कूल व ज्यु. कॉलेज नंदुरबार येथे दोन दिवसीय वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या विविध स्पर्धाची सुरुवात दि.18 जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताने करण्यात आली. तदनंतर कार्यक्रमांमध्ये विविध खेळाचे आयोजन अँग्लो उर्दु हायस्कूल क्रीडांगण व जिल्हा क्रिडा संकुल नंदुरबार येथे करण्यात आले.त्यामध्ये कबड्डी खो-खो , रिले रेस , संगीत खूर्ची, रस्सी कुद , क्रिकेट, स्लो सायकल,याप्रमाणे अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेत शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध खेळात मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला.

स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक फयाज सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विविध खेळ साहित्य उपलब्ध करून दिले तर उपमुख्याध्यापक कमररजा सर यांनी कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले.पर्यवेक्षक अब्दुल रहीम सर यांनी व शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी केली.अशा प्रकारे एक यशस्वी शालेय क्रिडा स्पर्धा उत्सहात संपन्न झाली.
