लोणावळा कुसगाव उपसरपंच सुरज केदारी यांच्यासह पाच जणांवर 307 दाखल…

0
7731

लोणावळा दि.6 : कुसगाव हद्दीतील ओळकाईवाडी, श्रमदान नगर येथे राहणाऱ्या दोन भावांना घरात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी उपसरपंच सुरज दत्ता केदारी यांच्या समवेत त्यांचे पाच साथीदार या सहा जणांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गु. र. नं.278/2021 भा. द.वी.307,452,324,323,427,504,506,507,143,147,148,149,188,269,270 साथ रोग अधिनियम क 3, मुंबई पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फिर्यादी – कुशल गुरुलिंग मनगिरे ( वय 27, रा. ओळकाईवाडी, श्रमदाननगर, लोणावळा ) याने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सुरज दत्ता केदारी, दत्ता पडवळ, शेखर केदारी, मयूर गोणते, रितेश भोमे, अमित गोणते हे सहाजण हातात लोखंडी सळया घेऊन फिर्यादी कुशल याच्या घरी जाऊन जमाव जमवून त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देवून ‘दत्ता पडवळ याला पत्रे काढायला सांगतो काय ‘असे बोलत फिर्यादीच्या घराची खिडकी तोडून आत घुसले व हातात असलेल्या लोखंडी सळईने फिर्यादी कुशल व त्याचा भाऊ कुणाल याला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

त्यात कुशल याच्या हाताला आणि कुणाल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सहाही आरोपींनी फिर्यादीच्या घरातील सर्व लोकांना मारहाण करत घरातील वस्तूंची तोडफोड करून मोठया प्रमाणात नुकसान केले व तिथून पळून गेले. सदर फिर्यादी नुसार सहाही जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटे करत आहेत.