लोणावळा दि.31: कामशेत येथून अपहरण झालेल्या तरूणाची पोलीसांनी अवघ्या पाच तासातच अपहरण कर्त्यांचे वाहन ताब्यात घेत आरोपींना अटक करुन तरुणाची सुखरूप सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.29/03/2021 रोजी सायंकाळी 7.00 वा. च्या सुमारास शुभम मंगेश भोसले( वय24, रा.निसर्ग ढाब्याच्या मागे कामशेत ता. मावळ) याने कामशेत पोलीस स्टेशन येथे येऊन कळविले की , त्याचा लहान भाऊ वैभव मंगेश भोसले याने गेल्या महिन्यात त्याच्या काॅलेज मधील मुलीशी अंतरजातीय प्रेम विवाह केला आहे.
मुलीच्या नातेवाईकांची सदर प्रेमविवाहाला मान्यता नसल्याने ते वारंवार मुलीला घरी परत ये असा अग्रह करत होते, परंतु मुलीने तिच्या नातेवाईकांना नकार दिला होता. त्यामुळे दि.29/3/2021 रोजी सायंकाळी 7.00 वा. च्या सुमारास मुलीचे नातेवाईक दोन चार चाकी वाहने घेवुन कामशेत येथे येऊन त्यांनी मुलीचा दिर अभय मंगेश भोसले (वय 18 वर्षे) याचे अपहरण करुन लोनावळ्याच्या दिशेने पळून गेले व जाताना त्यास आमच्या मुलीला परत पाठवा नाहीतर तुझ्या भावास जीवंत सोडणार नाही असे म्हनुन त्यास मारहाण करुन त्याचा मित्र राज मिरकूटे याचा मोबाईल घेवुन ते लोणावळ्याच्या दिशेने गेले असे सांगितले.
कामशेत पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सदर घटनेची माहीती घेऊन तत्काळ पोलिस उपनिरिक्षक सुरेखा शिंदे व स्टाफ ला घेऊन पोलिस स्टेशनच्या वाहनांनी धाव घेत लोणावळ्याच्या दिशेने अपहरण कर्त्यांचा पाठलाग सुरू केला .तसेच सदर घटनेची संपूर्ण माहीती डाॅ.अभिनव देशमुख पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण व सहाय्यक पोलिस अधिक्षक लोणावळा विभाग नवनित काॅवत यांना देऊन, नियंत्रण कक्षास पुणे लोणावळा व मुंबईच्या दिशेकडील सर्व टोलनाक्यावर अपहरण करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनित काॅवत यांनी लोणावळा विभागातील सर्व पथके तत्काळ शोधासाठी रवाना केली.घटनास्थाळावरील प्रत्यक्षदर्षी कडुन मारुती स्विफ्ट डिजायर कार नंबर (KA 29 N1093 ) या वहानांतुन आरोपींनी पलायन केल्याची माहिती सर्वांना कळवली या अनुषंगाने वरसोली टोलनाका येथे पोलिस उपनिरिक्षक लवटे लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन लोणावळा व त्यांच्या स्टाफने सदर वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु अपहरणकर्त्यांनी टोलनाक्यावरील बॅरीयल उडवुन नथांबता लोणावळ्याच्या दिशेने पळुन गेले.
पोलिस उपनिरिक्षक लवटे व त्यांच्या स्टाफने सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला असता पुढे गेल्यावर अंधाराचा फायदा घेवुन त्यांची गाडी लोणावळ्यातील अंतर्गत रस्त्यावरून तुंगार्ली परिसरात अज्ञात ठिकाणी लपून बसल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनित काॅवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पो.स .ई लवटे व लोणावळा पोलीस स्टेशनमधील स्टाफ यांनी तुंगार्ली परिसरात शोधमोहीम सुरु केली.अखेर रात्री 10.00 वा. च्या सुमारास अपहरण कर्त्यांचे वाहन क्र.KA 29N 1093 या वाहनासहीत आरोपी – अल्ताफ रुस्तम शेख (वय 24, रा.शिरापुर ता.मोहोळ जि.सोलापूर ), सिद्दराम अमसिद बिरादार (वय 23, रा.गोविंदपुर ता. ईंडी जि.विजापुर कर्नाटक), शरमतरबेज ख्वाजासैरनमुलक मुल्ला (वय 24, रा. उंब्रज, ता. चडचन, जि. विजापूर, कर्नाटक ) यांना तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता अभय भोसले याला त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या वाहनाने त्यांच्या तीन साथीदारांनी पुण्याला घेवुन गेल्याचे सांगीतले.
त्यानंतर पिडीत मुलगा अभय भोसले याच्या बाबतीत माहीती घेवुन ती माहीती स्थानीक गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या ताब्यात देऊन त्यांना पोलीस पथकासह विमाननगर पुणे येथे पाठविले. तिथे जाऊन ह्या पथकाने अभय भोसले याचा शोध घेऊन त्याची सुखरूप सुटका केली.
सदर कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक संजय जगताप, सहा. पो. निरीक्षक सुरेखा शिंदे, पो. हवा. मनोज माने, समीर शेख, अजय दरेकर, पो. ना. सागर बनसोडे, बाळकृष्ण भोईर, दत्ता शिंदे, मिथुन धेंडे आणि लोणावळा ग्रामीणचे पो. निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहा. पो. निरीक्षक निलेश माने,पो. स. ई. अनिल लवटे, पो. ना. मयूर अबनावे, संतोष शेळके, हनुमंत शिंदे, पो. शी. स्वप्नील पाटील, सिद्धेश शिंदे,भूषण कुवर, नागेश कमठनकर व लोणावळा शहर पोलीस स्टेशनचा सर्व पोलीस स्टाफ, स्थानीक गुन्हे शाखेचे पो. उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे, अमोल गोरे, सहा. फौजदार विजय पाटील, सर्व स्टाफ तसेच सायबर शाखा पुणे ग्रामीणचे पो. कॉन्स्टेबल सुनील कोळी यांनी केली आहे.