अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज ०७ वर्ष पूर्ण”

0
102


दि.२०/०८/२०२०
मावळ,अष्ट दिशा, वृत्तसेवा प्रतिनिधी, संतोष पवार ,अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज ०७ वर्ष पूर्ण होत आहेत. डॉ.दाभोळकरांच्या हत्येचा तपास स्थानिक पोलिसांकडून सीबीआय कडे वर्ग झाला आहे.मात्र सीबीआय तपास देखील संथ गतीने होत आहे असा आरोप अंनिसच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे आणि अंनिसचे कार्यकर्ते नाराज आहेत.


डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात झाली. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशी हत्या झाल्यामुळे. महाराष्ट्रातील अंनिसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, रस्त्यावर उतरले होते. प्रत्येकाच्या मनात भ्याड हल्ल्याची चीड होती. डॉ.दाभोळकर यांच्या हत्येनंतर पहीला तपास पुणे पोलिसांनी केला. त्यानंतर मात्र हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. तरी अजूनही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा प्रश्न रेंगाळताना दिसत आहे. काही संशयित आरोपींना या प्रकरणात ताब्यात देखील घेण्यात आले आहे. त्या आरोपींनी जामिनासाठी अर्ज देखील केले आहेत. परंतु अध्याप त्यांना जामीन मिळालेला नाही.


सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. परंतु या प्रकरणात ठोस असे काहीही अध्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल कधी लागणार. आणखी अटकेची कारवाई होणार का. असे अनेक प्रश्न कायम आहेत.