Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअकार्यक्षम जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची उचलबांगडी !

अकार्यक्षम जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची उचलबांगडी !

रायगडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.महेंद्र कल्याणकर रुजू…

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली झाली आहे.त्यांची आय.टी. सेंटर मुंबई डायरेक्टर पदी नियुक्ती झाली आहे.तर त्यांच्या जागी डॉ.महेंद्र कल्याणकर हे नवे जिल्हाधिकारी म्हणून २० ऑगस्ट २०२१ पासून रुजू झाले आहेत.२२ जानेवारी २०२० रोजी रुजू झालेल्या रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा हा दिड वर्षांचा कालावधी वादग्रस्तच ठरला.

शासन नियमानुसार तीन वर्षानंतरच शासकीय अधिका-यांची बदली होत असते , मात्र अकार्यक्षम म्हणून त्यांची दीड वर्षांत बदली झाल्याचे बोलले जाते.कोरोना काळ,अतिवृष्टी , वादळ वारा ,महापुरात त्यांची रायगडचे आपत्कालीन मुख्य अधिकारी म्हणून घेतलेले निर्णय नेहमीच वादग्रस्त ठरलेले होते.

कर्जतमध्ये देखील कोरोना लसीकरण केंद्राबाबत त्यांचे निर्णय चुकीचे असल्याची ओरड होती.सामान्य नागरीकांच्या तातडीच्या प्रश्नांबाबत देखील त्यांचे निर्णय सडेतोड नसायचे चिल्हार नदी बेकायदेशीर बांधकामाने आदिवासी व स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका असतानाही ते प्रकरण देखील अद्याप ” तथास्तु ” आहे.

महापुरात महाड येथील दरड कोसळून अनेकांचे नाहक जीव गेले ,या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील यांनी महापूर येण्यापूर्वी योग्य नियोजन केले नाही , असा ठपका जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यावर ठेवत मंत्रालयात आवाज उठवला असता अकार्यक्षम म्हणूनच त्यांची तीन वर्षांची मुदत संपन्या अगोदरच उचलबांगडी झाली ,असे ऐकण्यास मिळते .

- Advertisment -

You cannot copy content of this page