![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
नंदुरबार (प्रतिनिधी) दि. ६ एप्रिल २०२५ – देशातील ख्यातनाम शैक्षणिक संघटना असलेल्या अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ 11138 हायस्कूल, नंदुरबार जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची पुनर्रचना संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. साजिद निसार अहमद यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच करण्यात आली.
या वेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मिर्झा रिजवान (जिल्हाध्यक्ष – नाशिक प्रायव्हेट प्रायमरी), शेख तौफिक सर (जिल्हाध्यक्ष – धुळे) तसेच विविध हायस्कूलचे मुख्याध्यापक सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा कार्यकारिणीच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीमध्ये काझी नवेद सलीम यांची जिल्हाध्यक्षपदी, मंसुरी रिजवान सुपडू यांची सचिवपदी, तर शेख अझहर शेख सईद यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.
इतर नियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे –जिल्हा सल्लागार : सय्यद शाहिद अली जाहिद अली , जिल्हा उपाध्यक्ष : साबीर अहमद अनीस अहमद शेख, डॉ. शेख मिजानुर्रहमान शमिमोद्दीन, सहसचिव : काझी हफीजुद्दीन नजीरुद्दीन, कोषाध्यक्ष : पठाण रिझवान खान मुख्तार खान जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून पुढील व्यक्तींची निवड करण्यात आली.
कादरी मोहम्मद इकराम मुख्तारोद्दीन, खान अब्दुल्ला बिन अशरफ, पठाण फहीम खान सत्तार खान, मनियार अबरार अहमद बशीर अहमद, पठाण अजीम खान तुराब खान, धोबी खलील अब्दुलहमीद, जियाउल्लाह जकाउल्लाह इनामदार, वसीमुद्दीन शरीफुद्दीन काझी.
महिला प्रतिनिधीपदी सय्यद निलोफर वसीम यांची निवड झाली असून, प्रसार विभागाची जबाबदारी नाझीम भाई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या समारोपात सर्व नविन नियुक्त पदाधिकाऱ्यांना मा. साजिद निसार अहमद यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.