![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): शहराजवळील लायन्स पॉईट या ठिकाणाहून सुमारे 600 ते 700 फुट खोल दरीत पडलेल्या युवकाला अथक प्रयत्न करून बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश आले आहे.
काल दि.30 रोजी दरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह शोधण्याची व बाहेर काढण्याची मोहीम शिवदुर्ग रेस्क्यू पथकाकडून सुरु होती. अथक प्रयत्न करून सदरचा मृतदेह दरीत शोधण्यात पथकाला यश आले असून त्याला रोपच्या सहाय्याने वर काढण्यात आले आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत लायन्स पॉईट आहे. काल याठिकाणाहून सदरचा युवक दरीत पडला होता. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांना व आज सकाळच्या सुमारास शिवदुर्ग रेस्कू पथकाला माहिती समजल्यानंतर शिवदुर्गची टिम घटनास्थळी दाखल झाली. रोपच्या सहाय्याने टिम मधील काही सदस्य दरीत उतरत त्यांनी शोध मोहिम राबवत पडलेल्या तरुणाचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळून आला असून आज सायंकाळी हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
या रेस्क्यू पथकातील महेश मसने,सचिन गायकवाड सर, हर्ष तोंडे,योगेश उंबरे,सूरज वरे,योगेश दळवी,हर्षल चौधरी, आदित्य पिलाने,प्रिन्स बेठा, आयुष वर्तक,मधुर मुंगसे, वैभव राऊळ,राजेंद्र कडू,अशोक उंबरे,गणेश रौंदळ, अमित बलकवडे, सदाशिव सोनार, चंद्रकांत गाडे,अशोक कुटे, हनुमंत भोसले, केतन खांडेभरड, संतोष खोसे, अमोल सुतार,सुनील गायकवाड आदीजणांनी ही मोहीम यशस्वी पार पाडली.