Monday, September 26, 2022
Homeमहाराष्ट्ररायगडअखेर आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळाली...

अखेर आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळाली…

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
पनवेल तालुक्यातील आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळाली असून युवसनेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.आपटा आरोग्य केंद्रातर्गत अनेक आदिवासी वाड्या येत असून याभागात बहुतांश आदीवासी समाज राहतो, मात्र येथील आदिवासी रात्री अपरात्री या दवाखान्यात जावे लागते, विशेषतः महिलांना डिलिव्हरी वेळी अलिबाग ला जावे लागते, अश्या येथे नादुरुस्त रुग्णालयात असते, त्यामुळे अलिबाग ला रुग्णाला जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.


याची दखल युवासनेने घेत माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली केळवणे युवासेना अधिकारी स्वप्नील भोवड यांनी विशेष मेहनत घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी ,तालुका अधिकारी यांच्या कडे या मागणीची सातत्याने पाठपुरावा करून अखेर या आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाली असल्याने येथील नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page