Sunday, November 3, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअखेर पळसगाव खुर्द धनवी गावाचा पाणी प्रश्न सुटला..

अखेर पळसगाव खुर्द धनवी गावाचा पाणी प्रश्न सुटला..


स्वदेश फाउंडेशनने दिली तीन लाख लिटर पाण्याची टाकी बांधून,रासपचे नेते संतोष ढवळे व बाळाराम ढवळे यांच्या प्रयत्नांना यश..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

माणगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या पळसगाव खुर्द धनवी या गावाचा अखेर पाणीप्रश्न सुटला असून स्वदेश फाऊंडेशनच्या वतीने गावासाठी तीन लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधून दिली.


माणगाव तालुक्यात अतिशय दुर्गम भागात पळसगाव खुर्द धनवी हे गाव असून येथे धनगर , आदिवासी व मराठा समाजाची एकूण वीस घरे आहेत. पिढ्यान पिढ्या येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.


यांची दाखल स्थानिक रासप नेते संतोष ढवळे , बाळाराम ढवळे व शिव मल्हार मंडळ यांनी पुढाकार घेत स्वदेश फाउंडेशनशी संपर्क साधून गावात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई ची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली . त्यांनी त्यांची दखल घेत या गावासाठी तीन लाख लिटर पाणी साठेल इतकी मोठी पाण्याची टाकी बांधून दिली.


तिचे उदघाटन काल 15 ऑगस्ट चे औचित्य साधत नारळ फोडून करण्यात आले. स्वदेश फाउंडेशनने आमच्या गावासाठी ही पाण्याची टाकी बांधून दिल्याने येथील पाण्याची समस्या अखेर सुटली असून येथील ग्रामस्थांनी स्वदेश फाउंडेशनचे आभार मानले आहेत.


यावेळी स्वदेश फाऊंडेशनचे विनोद पाटील , वैभव पवार, भोसले साहेब , धनंजय गोरे , किरण खेडेकर व बालाजी गायकवाड या पदाधिकाऱ्यांसह रासपचे जिल्हा महासचिव संतोष ढवळे धनविकर,रासप माणगाव तालुका प्रमुख रविंद्र सुतार, सरपंच रामदास दाखिनकर, रासप माजी तालुका प्रमुख बाळाराम ढवळे, समाजसेवक अनिल मोहिते, संजोग मानकर आदींसह रासपचे पदाधिकऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page