खोपोली (दत्तात्रय शेडगे)
खोपोली मिळगाव येथे राहणारे सोमनाथ आप्पा घाटे व त्यांची पत्नी खोपोली येथील नगरपालिका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले असता त्यांच्या सोबत असलेल्या एकाने त्यांचा 2 वर्षाचा मुलगा त्याने पळविला होता.याची दखल खोपोली पोलिसांनी घेत तीन दिवस मोठ्या प्रमाणात शोधमोहीम चालू केली असून आज अखेर खोपोली पोलिसांना त्या लहान मुलाचा शोध घेण्यास यश आले आहे.
हा मुलगा आतोने वाडी ता सुधागड येथे सापडला असून आज खोपोली पोलिसांनी त्यांच्या आई वडील यांच्याकडे स्वाधीन केला, खोपोली पोलिसांनी केलेल्या या दबंग कामगिरी मुले खालापूरचे डीवायएसपी संजय शुक्ला यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
डीवायएसपी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिधामोहिन चालु असून खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, एपीआय कदम, एपीआय रजपूत, पीएसआय किसवे,पोलीस अंमलदार प्रदीप खरात,राम मासाल, विकास पाटील, प्रवीण भालेराव दत्ता निलंके यांनी विशेष मेहनत घेऊन या मुलाचा शोध लावला.