Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्रमुंबईअखेर शिवाजी पार्कचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान नामकरण झाले, छावा ग्रुपच्या...

अखेर शिवाजी पार्कचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान नामकरण झाले, छावा ग्रुपच्या प्रयत्नांना अभुतपुर्व यश..


खोपोली- दत्तात्रय शेडगे-

मुबई महानगर पालिकेने 1925 मध्ये जनतेसाठी उभारण्यात आलेल्या मैदानाला शिवाजी पार्क हे नाव देण्यात आले होते ,मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकेरी नावाचा उल्लेख होत होता. या पार्कचा होणारा शिवाजी महाराज उल्लेख त्वरित थांबवून छत्रपती शिवाजी महाराज मैदान नाव देण्यात यावे यासाठी छावा ग्रुप वतीने मुबंई महानगर पालिकेला निवेदन देण्यात आले होते.

या निवेदनाची मुबंई महानगर पालिकेने दखल घेत या मैदानाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज मैदान असे नाव देण्यात आले आहे.या मैदानावर कित्येक राजकीय पक्षाच्या सभा झाल्या मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाहि ,मात्र छावा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष पै आप्पासाहेब आखाडे यांच्या नेतृत्वाखाली हा ग्रुप संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार काम करत असून छावा ग्रुप मुबंई ने हे नाव बदलण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले होते.

याची दखल मुबई महानगर पालिकेने घेत आज शिवाजी पार्क नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज मैदान नाव देऊन तश्या नामफलक लावण्यात आले, छावा ग्रुपने केलेल्या कामाचे सर्वच कौतुक होत आहे.यावेळी छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब आखाडे, ,प्रदेशाध्यक्ष राऊभाऊ आखाडे, प्रदेश सचिव संजय बालगुडे, प्रदेश संपर्क प्रमुख सुनील गोरे, छावा ग्रुप मुबंई अध्यक्ष चिन्मय सुर्वे, उपाध्यक्ष मोहनिष राऊळ, कार्याध्यक्ष अपूर्व शेळके, संपर्क प्रमुख गिरीश वर्हाडी आदी सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..


- Advertisment -