आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न..
(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
कर्जतचे नंदनवन करण्याचे ध्येय उराशी बाळगून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणाली व मार्गदर्शनाने येथे विकास साधण्याचा प्रयत्न करत असताना विरोधकांच्या घाणेरड्या राजकारणाला शिवसेनेच्या स्टाईलने सडेतोड उत्तर द्या , असे घणाघाती गर्जना करत कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील भिसेगाव चाराफाटा ते श्रध्दा हॉटेल या कामांचे भूमिपूजन आज कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून व कुदळ मारून पार पडले.
यावेळी दोनच दिवसांपूर्वी श्रेय घेण्याच्या हेतूने विरोधकांनी उपोषणाचा जो घाट घातला त्यावर सडेतोड ते बोलत होते.यावेळी या भूमीपूजनाच्या सोहळ्यास कर्जत न.प.च्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी , मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल ,गटनेते नितीन सावंत , पाणीपुरवठा सभापती राहुल डाळींबकर , महिला व बाल कल्याण सभापती संचिता पाटील , उपसभापती प्राची डेरवणकर , बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे , समाज कल्याण सभापती वैशाली मोरे , नगरसेविका विशाखा जिनगरे , नगरसेवक बळवंत घुमरे , विवेक दांडेकर , संकेत भासे , माजी नगरसेविका यमुताई विचारे , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , संघटक संतोषशेट भोईर , शिवराम बदे , माजी उपसभापती मनोहर थोरवे , माजी नगरसेवक बाळाजी विचारे , दशरथ भगत , भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे ,ऍड.गायत्री परांजपे, शहासने , ताम्हाणे ,विभागप्रमुख मोहन भोईर , हालीवली सरपंच सौ.प्रमिला बोराडे , नारायण जुनघरे , विभागप्रमुख सुरेश भरकले , संभाजी जगताप ,माजी विभागप्रमुख सुरेश बोराडे , उद्योजक केतन जोशी , दिपक मोरे ,शरद हजारे , सौ.धनगर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार महेंद्रशेट थोरवे पुढे म्हणाले की , महाराष्ट्रात मा.मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व तुम्हा सर्वांच्या सहकार्याने मी या मतदारसंघात निवडून आल्यावर येथील विकास कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहेे. कोरोना काळात देखील अनेक कामांना मंजुरी मिळवून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून विकास साधला आहेे.
कर्जतचे प्रवेशद्वार निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार , प्रति आळंदी आमराई पुलाजवळ ,तर पूल ओलांडून गेल्यावर शिवसृष्टी ,आदी कामे पर्यटनाला प्रोत्साहन व चालना मिळणारी असून ,फार्म हाऊसने भरलेल्या तालुक्यात ग्रीन इंडस्ट्रीज आणून रोजगार उपलब्ध करणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले.कर्जतकरांना जो विकास बघायचा होता तो झाला नाही,आम्ही तोच साधण्याचा प्रयत्न करत आहोत यावर त्यांनी प्रकाश टाकला.
या भिसेगाव रस्त्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , उद्योगमंत्री सुभाष देसाई , नगराध्यक्षा सुवर्णा जोशी , गटनेते नितीन सावंत , माजी नगरसेवक बाळाजी विचारे ,यमुताई विचारे , संभाजी जगताप व भिसेगाव ग्रामस्थ मंडळाचे सहकार्य लाभले व माझ्या विनंतीला मान देऊन मा . मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ करोडचा निधी मंजूर केला हे सांगत विरोधकांचा उपोषणाचा घाट व घाणेरडे राजकारण यावर पालिकेतील शिवसेनेच्या सत्तेतील लोकप्रतिनिधींनी अशा उपोषणाला सडेतोड उत्तर द्या ,असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांनी आजच्या पर्यावरण व उद्याच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या . आजपर्यंत भिसेगाव ग्रामस्थांना जो या रस्त्यामुळे त्रास झाला यावर दिलगिरी व्यक्त करत त्यांच्या संयमाला सलाम केला. संयम ठेवल्यानेच एव्हढा मोठा निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगून ठेकेदाराने व्यवस्थित काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पाणी पुरवठा सभापती राहुल डाळींबकर यांनी विरोधकांना पावसाळी रानभाज्यांची उपहासात्मक टोला देत ह्या भाज्या उगवतात , तश्या संपतात , म्हणून विरोधकांच्या स्वार्थी राजकारणाकडे कुणी लक्ष नका देऊ ,महेंद्रशेट तुम्ही विकास कामे करून पुढच्या वेळी पुन्हा एकदा विजयी व्हा , असे मत व्यक्त केलेेेे.
तर बालाजी विचारे यांनी या रस्त्याबाबत कुणी कुणी प्रयत्न केले , हे सविस्तर सांगितले.यावेळी पालिकेचे नगर अभियंता मनीष गायकवाड , कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार , कल्याणी लोखंडे , भिसेगाव पोलीस पाटील संजय हजारे , भिसेगाव ग्रामस्थ , महिला मंडळ ,शिवसेना , भाजप ,चे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सूत्र संचालन अभिषेक सुर्वे यांनी केले .