Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळाअजूनही लोणावळेकर आठवडे बाजाराच्या प्रतीक्षेत....

अजूनही लोणावळेकर आठवडे बाजाराच्या प्रतीक्षेत….

लोणावळा : कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर झाले नसले तरीही शहरातील कोरोना रुग्ण संख्येमध्ये मोठया प्रमाणात घट होत आहे. आणि यावर जाणीव पूर्वक विचार करून लोणावळा प्रशासनाने शहरातील आठवडे बाजार सुरु करण्यासाठी मान्यता दयावी अशी आशा लोणावळेकरांकडून व्यक्त करण्यात येत असून. आठवडे बाजार सुरु करण्यासाठी विलंब का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लॉकडाऊन प्रक्रिया सुरु झाल्यापासून लोणावळा भाजी मार्केटमधील भाज्यांच्या दरात मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने लोणावळा व परिसरातील नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाने अनलॉक प्रक्रिया दरम्यान सर्व व्यवसाय नियम व अटी लागू करून सुरु करण्याकरिता परवानगी दिली आहे.
तसेच लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्याने येथील पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांचा विचार करून पर्यटन स्थळेही शासनाने सुरु केली आहेत. मग भाजी विक्रेत्यांच्या ह्या सक्ती विषयी नागरिकांच्या बाजूने लोणावळा प्रशासन विचार का करत नाही.
इथे महागलेल्या भाजी पाल्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन शहरातील शुक्रवारचा आठवडे बाजार सुरु करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर विचार करण्यात यावा अशी कळकळीची विनंती नागरिकांकडून करण्यात येत आहे. लॉक डाऊन प्रक्रिया सुरु झाल्यापासून येथील भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
कामशेत, वडगाव येथील भाजी दरापेक्षा लोणावळ्यातील भाजीचे दर हे प्रत्येक किलो मागे 15 ते 20 रु. जास्त आहेत. अशा परिस्थितीचा लोणावळा पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी शहरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शुक्रवार आठवडे बाजार सुरु करण्यासाठी विचार करावा अशी आग्रही विनंती “अष्ट दिशा ” बातमीपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना नागरिकांकडून करण्यात येत आहे. तरी लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी याचा विचार करावा.
- Advertisment -

You cannot copy content of this page