![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा दि. 8: लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी काही दिवसापूर्वी वरसोली टोल नाका येथे नाकाबंदी करून एका सराईत वाहने चोरट्याला अटक केली होती. अब्दुल रेहमान मेहबूब नाकेदार ( वय 22, सध्या रा. क्रांतीनगर, लोणावळा, मूळ रा. 123 रेल्वे लाईन, काडादी चाळ, जि. सोलापूर ) असे ह्या चोरट्याचे नाव असून लोणावळा शहर पोलीस व गुन्हे शोध प्रकटीकरण पथकाने त्याला आपल्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता काही महिन्यांपासून लोणावळा परिसरातील पाच वेगवेगळी वाहने चोरी केल्याची कबुली त्याने आज दिली आहे.
त्याच्याकडून दोन चारचाकी वाहने व तीन दुचाकी वाहने हस्तगत करून त्याचा साथीदार सागर श्रीरंग सुळे ( वय 25, रा. झरे, ता. आटपाडी, जि. सांगली ) यास तांत्रिक पद्धतीने तपास करून अटक करण्यात लोणावळा शहर पोलीस व गुन्हे शोध प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. सदर चोरट्यांनी ही वाहने विक्री करण्याच्या उद्देशाने चोरी केली असल्याचे तपासात समोर आले आहे.
लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेले वाहने चोरीचे भा. द. वि. कलम 379 प्रमाणे दाखल पाच गुन्हे सदर चोरट्यांकडून उघडकीस आले आहेत. त्यामध्ये यामाहा रे मोटर सायकल क्र. MH 14 EH 2691, होंडा कंपनीची हॉरनेट मोटर सायकल क्र. MH 12 QP 2380, होंडा युनिकॉर्न मोटर सायकल क्र. MH 14 GP 5596, मारुती सुझुकीची इको कार MH 14 CK 7371 व एक टवेरा कार MH 14 FS 5085 इत्यादी नोंद असलेले चोरीचे गुन्हे सराईत चोरट्यांकडून उघडकीस आले असून ही पाचही वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
अशी माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक, लोणावळा उपविभाग नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, वैभव सुरवसे ( पो. ना. ) किरण नांगरे ( पो. ना. ) विजय मुंडे ( पो. ना. ) अजीज मेस्त्री ( पो. कॉ. ) मनोज मोरे ( पो. कॉ.) राहुल खैरे ( पो. कॉ.) राजेंद्र मदने ( पो. कॉ. ) पवन कराड ( पो. कॉ.) यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.