Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअतिवृष्टीच्या पावसाने झोराबियन कंपनीचे केले कोट्यावधीचे नुकसान.

अतिवृष्टीच्या पावसाने झोराबियन कंपनीचे केले कोट्यावधीचे नुकसान.

(प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे) खालापूर गेल्या चार – पाच दिवसपासून पावसाने उच्चांक गाठल्याने या पावसामुळे अनेकांचे जनजीवन विस्कलित झाल्याचे पाहायला मिळत असताना बुधवारच्या मध्यरात्री खालापूरातील काही भागात पावसाने महापूर केल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले असून याचाच मोठा फटका डोळवली येथील झोराबियन चिक्स कंपनीला बसल्याने झोराबियन कंपनीचे जवळपास अडीच ते तीन कोट्याची आसपास नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.


डोळवली येथील झोराबियन चिक्स कंपनी कारखानदारी करीत असताना कंपनीच्या नफ्यातील काही रक्कम समाजसेवा करण्याकरीता वापरत असल्याने डोळवली परिसरात कंपनीच्या कौतुक होत असते, कोरोना या कंपनीने लाखो रूपयांची मदत करित गोरगरिबांना मदतीचा हात दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

तर हे सर्व व्यवस्थित सुरळीत असताना अतिवृष्टीच्या पावसाने झोराबियन कंपनीला मोठा झटका दिल्याने कंपनी व्यवस्थापन मोठ्या संकटात सापडल्याचे पाहावयास मिळत आहे.गेल्या चार – पाच दिवस पासून पावसाने संपूर्ण खालापूर तालुक्याला झोडपून काढले असता.

बुधवार रात्री पावसाने मोठा उच्चांक गाठल्याने या पावसात अनेकांचे जनजीवन विस्कलित झाले असता याचा मोठा फटका डोळवली येथील झोराबियन कंपनीला बसल्याने यामध्ये सर्व डिफ्रिजर, चिकनचे पदार्थ बनवण्याच्या मशीन, कोंबड्याचे खाद्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य, गाड्या, कोंबड्याचे ट्रे, चिकनचे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ, स्टेशनरी, ट्रक्टर, पाण्याची टाकी, कामगारांचे कामातील साहित्य, बागायत अशा अनेक प्रकारचे नुकसान झाल्याने झोराबियन कंपनी जवळपास अडीच ते तीन कोटी आसपासच्या मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page