![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
कार्ला (प्रतिनिधी) : कार्ला गावातील जमिन गट नं. 148 मधील अनाधिकृत व बेकायदेशीर बांधकाम तात्काळ काढा या मागणीसाठी कार्ला ग्रामस्थांकडून आज पासून पीएमआरडीएच्या विरोधात आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
कार्ला ग्रामस्थ भाऊसाहेब हुलावळे, गणेश वायकर, समीर हुलावळे, अनिल हुलावळे, सुखदेव हुलावळे, योगेश हुलावळे, विनोद हुलावळे आदी ग्रामस्थ उपोषणास बसले असून संपूर्ण कार्ला गावाने या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.तसेच कार्ला गावातील दुकान व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवत या उपोषणास पाठिंबा दिला.
कार्ला गावातील गट नं. 148 मध्ये अस्तित्वात असलेल्या मस्जिद च्या मागील जागेत अनधिकृतरित्या बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. जुन्या मस्जिद ला ग्रामस्थांचा विरोध नसून मागे बेकायदेशीरपणे बांधलेल्या बांधकामाला ग्रामस्थांचा विरोध आहे. हे बांधकाम तात्काळ काढा असा ठराव कार्ला ग्रामसभेने 26 जानेवारी रोजी करत तो अंमलबजावणीसाठी पीएमआरडीए कडे पाठविण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांनी अद्याप यावर कसलीच कारवाई केलेली नाही. 28 मार्च रोजी याबाबत स्मरणपत्र देण्यात आले तरी सुस्तावलेलं पीएमआरडीए प्रशासनाने काहीच हालचाल न केल्याने अखेर ग्रामस्थांनी आजपासून सदर बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
पीएमआरडीए प्रशासन कार्ला गावात व परिसरात जातीय दंगे होण्याची वाट पहात असले तरी आम्ही शांततेच्या मार्गाने लढा देणार आहोत.येथील मस्जिदला आमचा विरोध नाही तर त्या शेजारी नव्याने केलेल्या बांधकामाला विरोध आहे. सदर बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सर्व यंत्रणांना माहित असून देखील कारवाई केली जात नाही ही शोकांतिका आहे. मळवली गावात मोठमोठ्या इमारती जमिनदोस्त करणारे हे प्रशासन कार्ल्यात मात्र बघ्याची भुमिका घेत आहे मात्र जोपर्यंत ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहिल मंग त्यामध्ये आम्हाला जीव गमवावा लागला तरी बेहत्तर अशी भूमिका यावेळी उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केली.
यावेळी मावळचे नायब तहसिलदार रावसाहेब चाटे, सहायक गटविकास अधिकारी प्रताप पाटील, कृषी अधिकारी संताजी जाधव, मंडल अधिकारी माणिक साबळे, तलाठी मिरा बोऱ्हाडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण स्थगित करावे असे सांगितले मात्र ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कार्ला परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व पक्षीय पदाधिकारी, बजरंगदल मावळ, विश्वहिंदू परिषद, हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण मावळ तालुका वारकरी संप्रदाय यांनी पाठिंबा दिला.